#MeToo नंतर आणखी एका प्रकरणाने हॉलिवूडमध्ये खळबळ; कोण आहे रसेल ब्रँड?

Russell Brand  : रसेल ब्रँडवर चार महिलांनी केले गंभीर आरोप... कोणी लैंगिक शोषणाचे, लैंगिक अत्याचाराचे तर कोणी भावनिक शोषणाचे... जाणून घ्या कोण आहे का रसेल ब्रँड...

दिक्षा पाटील | Updated: Sep 19, 2023, 03:39 PM IST
#MeToo नंतर आणखी एका प्रकरणाने हॉलिवूडमध्ये खळबळ; कोण आहे रसेल ब्रँड? title=
(Photo Credit : Social Media)

Russell Brand  : लोकप्रिय कॉमेडियन आणि हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँडवर लैंगिक शोषण आणि भावनिक शोषणाचे आरोप लावण्यात आले होते. 2006 ते 2013 मध्ये जेव्हा रसेल त्याच्या करिअरच्या शिखरावर होता. तेव्हा रसेलनं चार महिलांचे लैंगिक शोषण केले आणि लैंगिक अत्याचार केले. याची संडे टाइम्स, द टाइम्स आणि चॅनल 4 डिस्पेचेसनं यांनी संयुक्त तपासनी केल्यानंतर हा आरोप केला आहे. मात्र, रसेलनं हे आरोप फेटाळले होते आणि सांगितलं होतं की महिलांसोबत असलेल्या त्यांचे शारिरीक संबंध हे त्यांच्या सहमतीनंच राहिले आहेत. 

रसेल ब्रँडविषयी बोलायचे झाले तर त्याच्याविषयी बीबीसीनं वृत्त दिलं होतं की रसेलचा जन्म एसेक्समध्ये झाला होता. त्याला खरी ओळख ही बिग ब्रदरच्या बिग माउथच्या होस्टच्या रुपात मिळाली होती. त्यानंतर त्याला हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या. रसेलनं जगातील सर्वात प्रसिद्ध पॉप स्टार्सपैकी एकाशी लग्न केलं आणि घटस्फोटही घेतला. रसेल ब्रँडनं त्याच्या करिअरची सुरुवात स्टँडअप कॉमेडियन म्हणून केली. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, रसेल ब्रँडनं XFM वर आणि नंतर BBC 6 म्युझिकवर रेडिओ कार्यक्रम होस्ट केले होते.

2005 च्या सुमारास, रसेल ब्रँडनं बिग ब्रदर ही प्रचंड लोकप्रिय रिअॅलिटी मालिका होस्ट केली. हा शो रसेल ब्रँडच्या करिअरचा टर्निंग पॉइंट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर त्यांनं बीबीसी रेडिओसाठी ब्रॉडकास्टर म्हणून काम केलं. यावेळी एका महिलेनं त्याच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या प्रसंगानंतर रसेलला बीबीसीमधून काढून टाकण्यात आले. यानंतर त्यांनं हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले.

कोणी काय आरोप केले?
चार महिलांनी रसेल ब्रँडवर आरोप केले आहेत. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, पहिल्या महिलेनं आरोप केला होता की रसेल ब्रँडनं त्याच्या लॉस एंजेलिसच्या घरात तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या वक्तव्याबाबत 'द टाइम्स वृत्त'पत्रानं म्हटले आहे की, महिलेच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी मेडिकल रेकॉर्डस पाहिले आहेत. 

दुसऱ्या महिलेनं रसेल ब्रँडवर आरोप केला की त्यानं तिचा लैंगिक छळ केला आहे. महिलेनं दावा केला की ती ब्रँडसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि जेव्हा ती ब्रँडसोबत रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा ती 16 वर्षांची होती आणि रसेल ब्रँड हा 30 वर्षांचा होता. ब्रँडनंही तिला खूप वाईट वागणूक दिली.

एका तिसऱ्या महिलेनं आरोप केले की लॉस एंजेलिसमध्ये काम करत असताना ब्रॅंडनं तिला लैंगिक छळ केला. इतकंच नाही तर त्यानं सांगितलं की कोणाला सांगितलं तर तो कायदेशीर कारवाई करेल. याशिवाय आणखी एका महिलेनं म्हणजेच चौथ्या महिलेनं रसेल ब्रँडवर आरोप केला की त्यानं तिचा लैंगिक छळ केला आणि त्यासोबत तिच्यावर शारिरीक आणि भावनिक अत्याचार देखील केले. 

हेही वाचा : घटस्फोटाच्या दोन वर्षात समांथा आणि नागा चैतन्यमध्ये झाला पॅचअप!

स्काय न्यूजनं मंगळवारी याविषयी सांगितले की, ब्रिटीश अभिनेता आणि कॉमेडियनच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर या प्रकरणी यूट्यूबनं रसेल ब्रँडच्या ऑनलाइन व्हिडिओंवरील जाहिराती देखील बंद केल्या आहेत. ब्रँड, एकेकाळी देशातील सर्वात मोठा कॉमेडियन आणि ब्रॉडकास्टर होता , त्याच्या YouTube चॅनेलचे 6 मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत.