खूपच अलिशान आहे अभिनेता कुशल बद्रिकेचं घर; पाहा फोटो

कुशल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो.

Updated: Feb 13, 2023, 01:39 PM IST
खूपच अलिशान आहे अभिनेता कुशल बद्रिकेचं घर; पाहा फोटो title=

मुंबई : चला हवा येऊ द्या' च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike).आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो. आपण प्रेक्षकांनी कुशल बद्रिकेचा आतापर्यंत प्रवास पाहिला आहे. त्याचप्रमाणे त्याला कुटुंबियांकडून मिळणारी साथ अतिशय खंबीर आहे.  कुशल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो.

त्याची विनोदाची टाईमिंग तर परफेक्ट आहेच पण अभिनेता,  म्हणूनही तो फार उत्तम कलाकार आहे. 17 नोव्हेंबर 1980 रोजी कोल्हापुरात कुशलचा जन्म झाला आणि तो कोल्हापुरातच वाढला.  कुशल काही फिल्मी बॅकग्राऊंड असणाऱ्या कुटुंबात वगैरे जन्माला आला नव्हता

पण शाळा कॉलेजमध्ये तो सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा, अभिनय करायचा आणि तिथूनच त्याच्या अभिनयाची पाळंमुळं रोवली गेली. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ते थेट मुंबईला आला.  

मराठीतील त्यांच्या काही नाटकांमध्ये जागो मोहन प्यारे आणि लाली लीला यांचा समावेश आहे. यामुळे त्याला मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पुरेशी संधी मिळाली. त्यानंतर त्याने फू बाई फू नावाच्या कॉमेडी शोमध्ये काम केलं, पण त्याला चला हवा यरु द्या साठी जास्त ओळखलं जातं.  याशिवाय, टीव्ही शो, मराठी टीव्ही पुरस्कार आणि अनेक टीव्ही शोमध्ये तो अँकरिंग करताना दिसला आहे .

त्याला लवकरच अनेक चित्रपट करण्याची संधी मिळाली, ज्याची सुरुवात २००५ मध्ये बायोस्कोप नावाच्या मराठी चित्रपटाने केली आणि नंतर त्याच्या चित्रपट कारकिर्दीत त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याच्या काही चित्रपटांमध्ये फ्रेंडशिप डॉट कॉम, 2006 मधील जत्रा आणि त्याच वर्षी माझा नवरा तुझी बायको यांचा समावेश आहे.

या चित्रपटानंतर 2011 मध्ये भाऊचा धक्का नावाचा त्याचा  दुसरा चित्रपट आला आणि त्यानंतर पुढच्या वर्षी 2012 मध्ये खेळ मांडला नावाचा सिनेमा आला  ज्यामध्ये त्याने मुन्ना नावाचं पात्र साकारलं होतं.  त्यानंतर एक होता काऊ आणि डावपेच नावाचे चित्रपट आले.

स्लॅमबुक, बकुळा नामदेव घोटाळे, लव्ह फॅक्टर, बारायण आणि स्ट्रगलर साला यांचा समावेश आहे. ठाणे येथील घोडबंदर येथे कुशल बद्रिकेचं खूपच अलिशान घर आहे. याआधी कुशल डोंबिवलीमध्ये राहायचा. कुशल त्याच्या घराचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो.