कृष्णा अभिषेकचं खरं नाव आहे वेगळंच...बच्चन कुटुंबामुळे बदललं नाव

नीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये कृष्णा अभिषेकने स्वतःच हे त्याचं खरं नाव नसल्याचा खुलासा केला आहे.

Updated: May 18, 2022, 02:02 PM IST
कृष्णा अभिषेकचं खरं नाव आहे वेगळंच...बच्चन कुटुंबामुळे बदललं नाव title=

मुंबईः कॉमेडियन कृष्णा अभिषेकला ज्या नावाने आपण ओळखता ते त्याचं खरं नाव नाही हे आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना, पण हे खरं आहे,  कृष्णाचे नाव 'कृष्णाभिषेक' नाही हे खरं नाव नाही..

अलीकडेच मनीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये कृष्णा अभिषेकने स्वतःच हे त्याचं खरं नाव नसल्याचा खुलासा केला आहे.त्या कॉमेडियनने त्याचे खरे नाव काय आहे आणि ते कसे बदलले हे देखील सांगितले आहे.

कृष्णाने सांगितले की, एका ज्योतिषाने मला सांगितले की जर मी माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये मला बदलले तर मी प्रसिद्ध होईन.

कश्मिरा शाहच्या सांगण्यावरून मी स्पेलिंग बदललं. स्पेलिंग बदलल्यानंतर 10 दिवसांनी मी 'नच बलिये' साइन केले आणि प्रसिद्ध झालो.

'माझी आई अमिताभ बच्चन यांची खूप मोठी चाहती होती, मी जन्माला आल्यानंतर तिनं माझं नाव बच्चन यांच्या मुलाच्या नावावरून अभिषेक असं ठेवलं. पण नंतर माझं नावही त्यांच्यामुळे बदललं

मी जेव्हा अभिनयाच्या दुनियेत आलो तेव्हा कोणी अभिषेकचा शोध घेतला तर अभिषेक बच्चनचा फोटो यायचा. मग मी माझे नाव बदलून कृष्णा अभिषेक ठेवलं