मुंबई : आत्तापर्यंत बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कोल्ड वॉरच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पण 'पद्मावत'नंतर मात्र दोन आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु झालेलं पाहायला मिळतंय.
'पद्मावत'मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या नकारात्मक भूमिकेतही रणवीर सिंग शाहीद कपूरपेक्षा जास्त भाव खाऊन गेलाय. अर्थातच याबद्दल शाहीदला प्रश्न विचारला असता, 'मी जर अलाउद्दीन खिलजी केला असता तर तो रणवीरपेक्षाही चांगला झाला असता' असं उत्तर शाहीदनं दिलंय.
खिलजीची भूमिका करायला आवडली असती का? असा प्रश्न जेव्हा शाहीदला विचारला गेला तेव्हा 'हो नक्कीच... कोण अभिनेता असेल जो संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात काम करायला नकार देईल? कॉफी विथ करणमध्ये एकदा रणवीरननं 'कमीने' सिनेमातील भूमिका माझ्याहून चांगली केली असती, असं म्हटलं होतं... यावेळी मी खिलजीची भूमिका रणवीरपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं निभावली असती' असं शाहीदनं म्हटलंय.
मी रणवीरहून वेगळ्या पद्धतीनं ही भूमिका साकारली असती कारण आम्ही दोन वेगवेगळे अभिनेते आहोत आणि आमची अभिनयाची स्टाईलही वेगळी आहे, असंही शाहीदनं स्पष्टीकरण दिलंय.
संजय लीला भन्साळी आपल्या सर्व सिनेमांचे हिरो स्वत:च असतात... सगळे अभिनेते त्यांच्यानंतर येतात, असं म्हणत शाहीदनं भन्साळी यांचं मात्र कौतुक केलंय.