'कुछ तो गडबड हैं दया...' CID फेम Shivaji Satam यांचा वाढदिवस

शिवाजी यांनी त्यांच्या खऱ्या जीवनात देखील CIDचा रोल केला आहे. 

Updated: Apr 21, 2021, 08:58 AM IST
'कुछ तो गडबड हैं दया...' CID फेम Shivaji Satam यांचा वाढदिवस  title=

मुंबई : 'CID'हा शो तर प्रत्येकाला माहित असेलचं आणि त्यात काही शंका देखील नाही. एखादा खूण होतो.  त्यानंतर घटनास्थळावरून CIDला फोन येतो. त्यानंतर चालू होते चौकशी. यादरम्यानचा एक वाक्य म्हणजे 'कुछ तो गडबड हैं दया...' CIDमध्ये एसीपी प्रद्यूमन ही भूमिका गाजवणारे अभिनेते शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस. शिवाजी यांनी त्यांच्या खऱ्या जीवनात देखील CIDचा रोल केला आहे. त्यांच्या खऱ्या आयुष्यात असं काही झालं की त्यांना CIDचा रोल करावा लागला. शिवाजी एका बँकेत कामाला होते. 

बँकेत कामाला असता काही एक प्रकार घडला. ती घटना मार्गी लावण्याची संधी पोलिसांनी शिवाजी यांना सोपावली. कोणाला माहित होतं, एक दिवस  ते एका प्रसिद्ध पोलिसाच्या भूमिकेत झळकतील. त्यांना साथ लाभली ती म्हणजे त्यांच्या नशिबाची आणि त्यांच्या प्रचंड मेहनतीची. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shivaji Satam (@shivaaji_satam)

शिवाजी साटम यांचा जन्म 21 एप्रिल 1950 साली झाला. त्यांनी 1980 साली आलेल्या 'रिश्ते-नाते' नाचकाच्या माध्यमातून अभिनयाला सुरूवात केली. त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील आपली महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाजी फक्त छोट्या पडद्यासाठी मर्यादित राहिले  नाहीत. 

शिवाजी यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील मोलाची भूमिका बजावली आहे.  'वास्तव', 'गुलाम-ए-मुस्तफा', 'सूर्यवंशम', 'नायक' यांसारख्या 35 हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. चित्रपट असो किंवा मालिका त्यांनी पोलिसाची भूमिका साकारली आहे.