चंकी पांडेचं जुनं फसलेलं फोटोशूट काय असतं ते पाहा... हसून हसून पोट दुखेल

चंकी पांडेचा जुना अंदाज पाहून नक्कीच त्याच्या चाहत्यांचं हसू आवरणार नाही.   

Updated: Mar 31, 2021, 02:58 PM IST
चंकी पांडेचं जुनं फसलेलं फोटोशूट काय असतं ते पाहा... हसून हसून पोट दुखेल title=

मुंबई : 'तेजाब', 'आंखे', 'पापा की दु्निया' या सिनेमांच्या माध्यमातून  अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता चंकी पांडे सध्या एका खास गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. चंकी पांडे काही जुने फोटो  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येकाला त्यांचा आवडता कलाकार जुन्या फोटोंमध्ये कसा दिसत असेल याची उत्सुकता असते. तर चंकी पांडेच्या चाहत्यांना त्याचे जुने फोटो पाहायला मिळणार आहेत. चंकी फोटोंमध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. फोटो पाहून  तुम्हाला 'सुखदधक्का' बसेल. 

चंकी पांडेचा जुना अंदाज पाहून नक्कीच त्याच्या चाहत्यांचं हसू आवरणार नाही. त्यामुळे चंकीचे  हे फोटो  नक्कीचं पाहा... 

फिट राहण्यासाठी चंकीने केलेली मेहनत तुम्हाला या  फोटोंमध्ये दिसत आहे. 

कलाकार हे दोन प्रकारचे आहे. एक प्रेक्षकांचं मन त्याच्या अभिनयाने जिंकतो तर,  कलाकारांचा दुसरा वर्ग म्हणजे तो स्वतःच्या फोटोंमुळे चाहत्यांना हसण्यास भाग पाडतो. चंकी या दोन्ही वर्गामध्ये फिट बसतो. 

सांगायचं झालं तर चंकी ऐकेकाळी प्रसिद्ध अभिनेता होता. त्याने त्यांच्या विनोदबुद्धीने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. पण  सर्वांनाचं  बॉलिवूडमध्ये मुख्य भुमिका मिळत नाही. चंकीला देखील रूपेरी पडद्यावर मुख्य भुमिका साकारण्याची संधी मिळाली नाही. पण आजही चंकी तो चाहत्यांच्या मनात कायम आहे.