56 व्या वर्षी अरबाज होणार वडील? शुरा खानच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच चर्चा

Arbaaz Khan's Wife Sshura at Hospital : अरबाज खानच्या पत्नीच्या त्या व्हिडीओमुळे प्रेग्नंसीच्या चर्चा! वयाच्या 56 व्या वर्षी अरबाज खान होणार वडील!

दिक्षा पाटील | Updated: Jul 3, 2024, 01:21 PM IST
56 व्या वर्षी अरबाज होणार वडील? शुरा खानच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Arbaaz Khan's Wife Sshura at Hospital : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये अरबाजनं मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केलं. त्यानंतर सगळीकडे त्यांचीच चर्चा रंगली होती. आता लग्नाच्या काही महिन्यांनंतर शूरा खान ही गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्यात आता अरबाज आणि शुराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून शुरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

अरबाज आणि शूराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत अरबाज आणि शूरा हे मॅटर्निटी रुग्णालयातून बाहेर पडताना दिसले. त्या दोघांना मॅटर्निटी रुग्णालयातून बाहेर येताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी लगेच प्रश्न विचारला की 'गुडन्यूज आहे का?' यावेळी अरबाज किंवा शुरा दोघांपैकी कोणीही यावर उत्तर दिले नाही आणि थेट त्यांच्या गाडीच्या दिशेनं जातांना दिसले. या व्हिडीओला पाहून त्यावर आता नेटकऱ्यांनी देखील कमेंट करण्यास सुरुवात केली आहे की 56  व्या वर्षी अरबाज बाबा होणार आहे का? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अरबाज आणि शूराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, मला वाटतं शूरा खान प्रेग्नंट आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, खान कुटुंबात आणखी एका व्यक्ती येणार. तिसरा नेटकरी म्हणाला, 'हे ऐकताच अरबाजच्या तोंडावर 12 वाजलेत.' 

हेही वाचा : आईच्या निधनानंतर वडिलांची 4-5 लग्न, 'वडा-पाव गर्ल' चंद्रिका दीक्षितनं भावूक होत पहिल्यांदाच सांगितलं वास्तव

दरम्यान, अरबाज आणि शूराची पहिली भेट ही 'पटना शुक्ला' च्या सेटवर झाली. शूरानं रवीना टंडनसोबत अनेकांसोबत काम केलं आहे. पहिल्या भेटीनंतर अरबाज आणि शूरा यांना एकमेकांवर प्रेम झालं. अरबाज आणि शूरानं एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर डिंसेबर 2023 मध्ये लग्न केलं. लग्न झाल्यापासून अरबाज आणि शूरा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो देखील शेअर करताना दिसतात. एकमेकांवरचं प्रेम हे त्या फोटोंमध्ये दिसून येते. याशिवाय ते दोघं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे शूरा ही अरबाजपेक्षा वयानं 15 वर्षांनी लहान आहे. शूराआधी अरबाज हा जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. ते दोघे अनेकदा एकत्र दिसायचे. तर अरबाज आणि शूरा दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. शुराला एक मुलगी आहे तर अरबाजला मुलगा असून त्याचं नाव अरहान खान आहे.