#MeToo प्रकरणात चित्रांगदाची उडी

नवाजुद्दीनसोबत घाणेरडे सीन करण्यासाठी दिग्दर्शकाची जबरदस्ती 

#MeToo प्रकरणात चित्रांगदाची उडी  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये #MeToo कॅम्पेनला सुरूवात झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून असंख्य महिला कलाकारांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली आहे. काहींनी तर अगदी 20 वर्षांपूर्वीची गुपितं उघड केली आहेत. आता अभिनेत्री चित्रांगदाने देखील तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. 

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बाबूमोशाय बंदूकबाज' सिनेमात चित्रांगदा लीड अभिनेत्रीचा रोल साकारत होती. या सिनेमातील दिग्दर्शकाने तिला असे काही सीन करायला सांगितले ज्यासाठी तिने सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शकाने तिच्यासोबत सेटवर खूप चुकीची वर्तणूक केली होती. 

चित्रांगदाला नवाजुद्दीनसोबत खूप घाणेरडे सीन करायला सांगितले. तनुश्रीने या सर्व प्रकरणाला वाचा फोडली या सगळ्याचं क्रेडिट मी तनुश्रीलाच देते. तसेच चित्रांगदाने मीडियाचं देखील कौतुक केलं. चित्रांगदा पुढे म्हणाली की, एकदा सीन सुरू असताना दिग्दर्शकसमोर आले आणि त्यांनी मला फालतू सीन करायला लावले.