मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या छिछोरे सिनेमाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच दिवशी नितेश तिवारी यांचा हा सिनेमा रिलीज झाला होता. मोठ्या पडद्यावरील सुशांतचा हा शेवटचा चित्रपट होता. अभिनेता सुशांतच्या निधनानंतर आता छिछोरेच्या टीमने त्याच्या आठवणीत एक खास व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडीओमध्ये छिछोरेचे बीटीएस सीन दाखवले गेले आहेत. व्हिडिओमध्ये सुशांत मस्ती करताना दिसत आहे.
हा सुंदर व्हिडिओ श्रद्धा कपूर, वरुण शर्मा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना नितेश तिवारी लिहितात की, तू आमच्या अंत: करणात सदैव जिवंत राहशील. त्याचबरोबर वरुणने फक्त कम्मो लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रद्धाने को-स्टारसाठी एक खास संदेशही लिहिला. ती म्हणते की, सुशांतच्या प्रेमळ आठवणींमध्ये. यावेळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधील चित्रपटाचे 'वो दिन भी क्या दिन था' हे गाणे सर्वांना भावनिक करीत असून सुशांतची आठवण करण्यास भाग पाडत आहे.
व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या व्यक्तिरेखेसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. तो आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत विनोद करतानाही दिसतो. कधी केक कापत, तर कधी प्रत्येकासह फोटो क्लिक करून. या सिनेमात ताहिर राज भसीन, प्रतीक बब्बर, नवीन, तुषार पांडे आणि शर्श कुमार शुक्ला यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. हे सर्वजण या चित्रपटात सुशांतच्या मित्राच्या भूमिकेत होते.
सुशांतसिंह राजपूतच्या हिट चित्रपटांमध्ये छिछोरे हा सिनेमा नेहमी लक्षात ठेवला जाईल. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाला कोणताही पुरस्कार न मिळाल्याने कंगना राणौतने याबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती.