हिंदी मालिका ते 'चरणदास चोर' व्हाया 'एम. एस. धोनी'

क्युँकी सास भी कभी बहु थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, कसम से, हवन, माटी की बन्नो, सात फेरे, बंधन ते अलिकडच्या जोधा अकबर आणि एक दुजे के वास्ते, आदी जवळपास पंधराहून अधिक टीव्ही मालिकांच्या हजारो भागांचे लेखन-दिग्दर्शन करणारे श्याम माहेश्वरी 'चरणदास चोर' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. 

Updated: Dec 19, 2017, 11:25 PM IST
हिंदी मालिका ते 'चरणदास चोर' व्हाया 'एम. एस. धोनी' title=

मुंबई : क्युँकी सास भी कभी बहु थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, कसम से, हवन, माटी की बन्नो, सात फेरे, बंधन ते अलिकडच्या जोधा अकबर आणि एक दुजे के वास्ते, आदी जवळपास पंधराहून अधिक टीव्ही मालिकांच्या हजारो भागांचे लेखन-दिग्दर्शन करणारे श्याम माहेश्वरी 'चरणदास चोर' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. 

१९९४ पासून ते २०१४ पर्यंत सतत टेलिव्हीजन डेली सोप केल्यानंतर श्याम माहेश्वरी यांनी क्रिकेटपटू महेन्द्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारीत 'एम. एस. धोनी – दी अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटासाठी संशोधन व पटकथा लेखनात सहाय्य केले. 'के' सिरीजसह गेली वीस वर्षे टीव्ही मालिका आणि एम. एस. धोनी सारख्या सुपरहीट चित्रपटाचे लेखन केल्यानंतर श्याम माहेश्वरी यांनी मराठी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन तसेच निर्मिती करणे, ही मराठी चित्रपट सृष्टीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. हिंदी टेलिव्हीजन आणि बॉलीवूडमध्ये लेखन-दिग्दर्शन केलेल्या श्याम माहेश्वरी यांचा २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा 'चरणदास चोर' हा नक्कीच उत्सुकता वाढविणारा आहे.

चरणदास चोर...

चरण चंद्रकांत मोरे या साध्या व गरीब स्वभावाच्या चाकरमान्याची ही गोष्ट आहे. अनावधानाने त्याच्याकडून एक चोरी होते. चोरी साधीसुधी नाही तर तब्बल दोन कोटी रुपयाची आहे. दोनशे रुपये खर्च करण्याची अक्कल नसलेल्या चरण मोरेचा चोरी केल्यानंतरचा रोलर कोस्टर प्रवास अत्यंत मार्मिक, खुमासदार विनोदी पद्धतीने दाखविण्यात आला आहे. बऱ्याच काळानंतर सात्विक आणि सकस विनोद ‘चरणदास चोर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या २९ डिसेंबर रोजी चरणदास चोर महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.