चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचे काही खास फोटोज...

अभिनेता चंकी पांडेची मुलगी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकेल.

Updated: Apr 13, 2018, 02:41 PM IST
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचे काही खास फोटोज... title=

मुंबई : बॉलिवूड सिनेमात झळकलेला अभिनेता चंकी पांडे सध्या सिनेमांपासून दूर आहे. पण त्याची मुलगी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकेल. करण जोहरचा आगामी सिनेमा स्टूडेंट ऑफ द ईअर २ यातून चंकी आणि भावना पांडे यांची १८ वर्षांची मुलगी अनन्या पर्दापण करणार आहे. यात अनन्या आणि टायगर श्रॉफ ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्‍टूडेंट ऑफ द ईयर 2' याच वर्षी २३ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. एका ऑडिशनमध्ये करण जोहरने अनन्याला सिलेक्ट केले. 

चंकी पांडे म्हणाला...

आपल्या या मुलीच्या यशाबद्दल चंकी पांडे म्हणाला की, अनन्या अभिनेत्री होऊ इच्छिते. काहीच दिवसांपूर्वीच तिने मला तिचा हा निर्णय सांगितला. माझी इच्छा आहे की, तिने स्वतःचे नाव कमवावे.
यापूर्वी सलमान खान अनन्या पांडेला लॉन्च करणार अशी खबर आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानची बहिण अर्पिताचा पती आयुष शर्माला ब्रेक देण्यासाठी सलमान अनन्याला बॉलिवूडमध्ये आणण्याच्या तयारीत होता. यासाठी अनन्याला यास्मीन कराचीवाला यांनी फिटनेस ट्रेनिंगही दिली होती. त्याचबरोबर तिच्यासाठी खास न्युट्रीशियनिस्ट देखील योजला होता. 

Ananya Panday

Ananya Panday

Ananya Panday

लूक्ससाठी लोकप्रिय

अनन्या शाहरुखची मुलगी सुहाना आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरची बेस्ट फ्रेंड आहे. या तिन्हींना अनेकदा एकत्र पार्ट्यांमध्ये पाहण्यात येते. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली अनन्या तिच्या लूक्ससाठी लोकप्रिय आहे. 

Ananya Panday

Ananya Panday