आयुष्यमानऐवजी सुशांतला होती पसंती; पण कशासाठी?

आयुष्मानने शेअर केला खास फोटो 

Updated: Oct 27, 2020, 07:22 PM IST
आयुष्यमानऐवजी सुशांतला होती पसंती; पण कशासाठी?  title=

मुंबई : दिग्दर्शक अभिषेक कपूर सध्या आपल्या 'चंदीगड करे आशिकी' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर दिसणार आहे. आयुष्मानने आपल्या इंस्टाग्राम तो, वाणी आणि अभिषेकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र आयुष्मानच्या अगोदर या सिनेमात सुशांत सिंह राजपूतची पसंती होती. 

अभिषेक कपूरचं केदारनाथ सिनेमानंतर सुशांत सिंह राजपूतसोबत या सिनेमाबद्दल बोलणं झालं होतं. या सिनेमाकरता सुशांतला घेण्यात येणार होतं. मात्र पुढे काही तरी वेगळंच लिहिलं होतं. मात्र आता 'चंदीगड करे आशिकी' मध्ये सुशांतच्या जागी आयुष्मान खुराना दिसणार आहे. आयुष्माननेच याचा खुलासा केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

आयुष्मान या सिनेमात क्रॉस फंक्शनल एथलीटची भूमिका साकारत आहे. सध्या तो आपल्या शरीरावर भरपूर मेहनत घेत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत वाणी कपूर देखील काम करत आहे. हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s going to be a different me in this different film. Movie prep going strong @gattukapoor

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला.