भाऊ कदमची लेक 'या' व्यक्तीच्या प्रेमात? फोटो शेअर करत म्हणाली...

मृण्मयीने पोस्ट करत म्हटलं आहे की, माझ्या सर्व मंडळींनी माझा प्रवास पाहिला आहे. मला तुम्हाला काही सांगायचं आहे.

Updated: Jan 24, 2023, 12:06 PM IST
भाऊ कदमची लेक 'या' व्यक्तीच्या प्रेमात? फोटो शेअर करत म्हणाली... title=

मुंबई : आपल्या विनोदाने सर्वांना हसायला लावणारा विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या सेलिब्रिटीच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. आता भाऊ कदमच्या लेकीबद्दल मोठी बातमी समोर येत आहेत. भाऊ कदमची मुलगी मृण्मयी (Mrunmayee) सध्या चर्चेत आहे. भाऊ कदमच्या लेकीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने आपली इच्छ पूर्ण झाल्यानंतर भावना व्यक्त केली.

मृण्मयीने पोस्ट करत म्हटलं आहे की, माझ्या सर्व मंडळींनी माझा प्रवास पाहिला आहे. मला तुम्हाला काही सांगायचं आहे. आदित्य आणि मी एकमेकांना गेल्या ६-७ वर्षांपासून ओळखतो. आम्ही लहानपणापासून एकाच शाळेत शिकत होतो पण मला आता याबाबत बोलावं लागत आहे. फक्त आदित्यबद्दलच नाही तर त्याच्या फॅमिलीबद्दल. त्याची आई आणि माझी फॅमिली खूप क्लोज आहे. त्याला तुम्ही माझ्या व्लॉग्स, स्टोरीमध्ये पाहिलं असेल. आम्ही आमच्या कुटूंबासोबत एकत्र फिरायला जातो. याशिवाय आमच्यात काहिच नाही.

याचबरोबर मृण्मयीने अजून एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने या पोस्ट मध्ये लिहीलं आहे की, मी आराध्याला त्याचा हात माझ्या हातात द्यायला सांगितला आणि पोझ दिली. ज्यांना सगळं माहिती आहे. मात्र या पोस्टबाबतची बातमी पाहून मी खूप डिस्ट्रब झाले. मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते. यात कुठेतरी माझंच चुकतं आहे. मला हे क्लिअर करायचं आणि मला याचा खुलासा करायचा आहे की, मला कुणीच प्रपोज केलं नाही. मी लवकर लग्न वैगरे करणार नाही. याच कारणांमुळे मी दररोज व्लॉगिंग करत नाही. लोकांना कॉन्ट्रोव्हर्सी करायची सवय आहे. पण यामुळे मला खूप त्रास होतो. आता मी त्याचाच सामना करत आहे. 

ती पुढे म्हणाली की, मला इंस्टा स्टोरीवर फोटो काढायला आवडतात. मला वेगवेगळ्या पोझही द्यायला आवडतात. हे तुम्हाला माझ्या सोशल मीडियावर पाहिलंच असेल आणि हो मी माझ्या एका पोस्टमध्ये रिंग फ्लॉन्ट केली होती. कारण ती माझी आवडती पोझ आहे. मला ही रिंग श्वेता आंब्रेने दिली आहे. मला आदित्यच्या आईने वाढदिवसाला ही रिंग गिफ्ट केली होती. मला रिंग घालायला खूप आवडतात. हा फोटो आदित्यने क्लिक केलेला नाही. त्याच्या आईने काढला असल्याचं सांगितलं.

मी माझ्या आई आणि आदित्य व त्याची आई आणि आराध्य आमच्यासोबत अलिबागला आलो होतो. ही काही प्रपोजल टूर नव्हती. तिथे आम्ही का गेलो होतो हे मी काही महिन्यांपर्यंत मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी तुमच्या सगळ्यांसाठी व्लॉग्स करते तो तुम्ही एन्जॉय करा. पण आता मी त्याला व्लॉग्समध्ये घ्यायचं की नाही याचा विचार करत आहे.

मी फक्त २१ वर्षांची आहे. माझी खूप स्वप्न आहेत जी मला पूर्ण करायची आहेत. माझा लग्नावर विश्वास नाही. त्यामुळे मी लग्नाचा विचार सध्यातरी करत नाहीये. मृण्मयीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Mrunmayee kadam social media) दरम्यान, 'चला हवा येऊ द्या' कार्यमात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येत असतात.