Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या प्रेक्षकांना मोठा धक्का, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं धरला बाहेरचा रस्ता...

महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला खळखळून हसवणारा लोकप्रिय Chala Hawa Yeu Dya  या शोच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आहे. या शोमधून एका प्रसिद्ध अभिनेत्याने बाहेरचा रस्ता धरला आहे. तो अभिनेता म्हणजे...

Updated: Jan 11, 2023, 07:03 PM IST
Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या प्रेक्षकांना मोठा धक्का, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं धरला बाहेरचा रस्ता... title=

Swapnil Joshi Exit From Chala Hawa Yeu Dya : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hava Yeu Dya) हा शो लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक आहे. 'चला हवा येऊ द्या' या शोनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोनं प्रेक्षकांना हसून हसून वेड लावलं. या शोमधील कलाकार भाऊ कदम (Bhau Kadam), श्रेया बुगडे (Shreya Bugade) ते परिक्षक स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) पर्यंत सगळेच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. फक्त विनोद करणं नाही तर त्या विनोदाच्या वेळेत हसणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आता सगळ्यांच्या आवडत्या या शोमधून एक अभिनेता आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे.

चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या शोमधून स्वप्निल जोशीनं निरोप घेतला आहे. खरंतर शोमधून कोणताही विनोदवीर नाही तर परिक्षकानं निरोप घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मनोरंजन मराठी ऑफिशअल या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये स्वप्निलनं चला हवा येऊ द्या या शोचा निरोप घेतल्याचे सांगितले आहे. स्वप्निलची जेव्हा या शोमध्ये एण्ट्री झाली होती, तेव्हा त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता की आता त्यांना नेहमीच स्वप्निलला पाहता येणार आहे. मात्र, त्यानं शो सोडल्याच्या बातमीनं चाहत्यांना त्याहून जास्त दु: ख झाले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर अजून स्वप्निल किंवा शोच्या टीममधील एका ही व्यक्तीनं या बातमीवर दुजोरा दिला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, 'चला हवा येऊ द्या' हा शो हा संपूर्ण महाराष्ट्रात इतका लोकप्रिय आहे की या शोमध्ये फक्त मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारा त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येत नाही, तर हिंदी चित्रपटातील कलाकार देखील चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावतात. 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, निलेश साबळे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम यांसारखे कलाकार आहेत. ते अचूक वेळेवर अचूक विनोद करत शोमध्ये विनोदांची मेजवाणी लावतात. 

हेही वाचा : 'मारहाण- शिवीगाळ आणि ...', 5 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय अभिनेत्रीने घेतला 'त्या' गोष्टीचा धसका

स्वप्निल जोशी हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. स्वप्निल त्याच्या कामा पेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. स्वप्निल त्याच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करत असून त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो.