Urfi Javed विरोधात पोलिस तक्रार; वकिलांनी केला गंभीर आरोप

दरम्यान, या आधी उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 

Updated: Dec 12, 2022, 06:13 PM IST
Urfi Javed विरोधात पोलिस तक्रार; वकिलांनी केला गंभीर आरोप title=

Case Filed Against Urfi Javed Over Obscene Act : ‘बिगबॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद (urfi javed) ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, अशा वेगळ्या आऊटफिटमुळे उर्फीच्या विरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्यानं रविवारी सांगितले की, उर्फीच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावर असभ्य कृत्य केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी वकील अली काशिफ खान यांनी पोलिस ठाण्यात ही तक्रार दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फीची फॅशन अनेकांना आवडणार नाही पण तिची स्टाइल ही नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष वेधते. अलीकडेच चेतन भगतनं एका साहित्यिक कार्यक्रमात उर्फीच्या कपड्यांवर वक्तव्य केलं होते की तिच्यामुळे मुलांचे लक्ष दुसरीकडे वळते. चेतन भगतच्या या वक्तव्यावर उर्फीनं सडेतोड उत्तर दिले आहे आणि मीटूचे आरोप करत त्यांचे चॅट शेअर केले. तुम्ही लेखक नाही मग साहित्याच्या कार्यक्रमात त्याचे नाव का घेतले जात आहे, असा प्रश्न उर्फीनं यावेळी केला. 

हेही वाचा : लग्नाच्या 10 वर्षांनंतर Ram Charan नं चाहत्यांना दिली Good News!

उर्फीनं 'बेपनाह', 'डायन' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये काम केले आहे. 'बिग बॉस ओटीटी' या रिअॅलिटी शोमधून त्याला ओळख मिळाली. पहिल्याच आठवड्यात उर्फी शोमधून बाहेर पडली पण त्यानंतर उर्फीनं मागेवळून पाहिलं नाही आणि ती सोशल मीडिया स्टार बनली आहे. उर्फी सोशल मीडियावर रोज तरी एक भन्नाट आऊटफिटमध्ये व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, उर्फीच्या कपड्यांची खासीयत म्हणजे तिच्या कपड्यांच्या कलेक्शनमध्ये फुलं, सायकलची चेन, काच, फोन आणि सिमकार्डचा समावेश आहे.