मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशभरात एक भयंकर रुप धारण केलं आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा पाहता अमेरिका सर्वात पहिल्या स्थानावर आहे त्यानंतर ब्राझील आणि मग भारत. सर्वाधिक कोरोनारुग्ण वाढणाऱ्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरोनाची लागण कलाकारांना झाली आहे. बॉलिवूड पाठोपाठ हॉलिवूडमधील कलाकारांना देखील झाली आहे. हॉलिवूड अभिनेता निक कॉर्डेरो (Nick Cordeiro) चा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. निक फक्त ४१ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला टोनी अवॉर्ड देखील मिळाला आहे.
अभिनेता निक कॉर्डेरो गेल्या ९० दिवसांपासून रूग्णालयात दाखल होता. त्याची पत्नी अमेंडा क्लूट्सने याबाबतची माहिती दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करून मॅसेज दिला आहे की, आता परमेश्वराकडे स्वर्गात आणखी एक स्वर्गदूत आला आहे.... असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट करून दिली.
अभिनेता निक खूप दिवसांपासून कोरोनाशी लढत होता. कोरोनामुळे निकच्या पायाला देखील जखम झाली आणि त्याचा पाय कापण्यात आला. निक गेल्या ३० दिवसांपासून कोरोनाशी लढा देत होता. अखेर ती झुंज संपली.