'बॉईज ४' येणार; चार भाग असणारा मराठीतील पहिला चित्रपट

प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला व बहुचर्चित असा 'बॉईज ४' हा चित्रपट मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर 'बॉईज'च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. 'बॉईज ३'च्या भरघोस यशानंतर आता 'बॉईज ४' धमाका करायला येत आहेत. 

Updated: Sep 6, 2023, 02:03 PM IST
'बॉईज ४' येणार; चार भाग असणारा मराठीतील पहिला चित्रपट title=

मुंबई : प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला व बहुचर्चित असा 'बॉईज ४' हा चित्रपट मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर 'बॉईज'च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. 'बॉईज ३'च्या भरघोस यशानंतर आता 'बॉईज ४' धमाका करायला येत आहेत. नुकतेच 'बॉईज ४'चे पोस्टर सोशल मीडियावर झळकलं असून 'आपण येणार तर धमाका होणार' असं म्हणत 'बॉईज ४' येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत.

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ४' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केलं असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. वैशिष्टय म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत.

 'बॉईज १', 'बॉईज २' ला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम आता 'बॉईज ३' ला तिपटीने वाढलं.. 'बॉईज'ची ही धमाल आता लवकरच चौपट होणार आहे. चित्रपटात 'बॉईज ४' ची घोषणा नुकतीच झाली असून 'बॉईज ४' लाही प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळेल, अशी मला खात्री आहे. असं दिग्दर्शक म्हणाले"

यापूर्वी  'बॉईज'च्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालता होता. आता यंदाच्या वर्षी धैर्या, ढुंग्या आणि कबीर काय धमाका करणार आहेत, हे पाहाण्याची सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे. अभिनेता अभिनय बेर्डेने त्याच्या सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहीलंय की, कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येणार, तर धमाका होणारच ना भाई  २० ऑक्टोबर ला थिएटर्स मध्ये धुमाकूळ घालायला येताहेत आपले बॉईज ... ! 

'बॉईज ४' बद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, " आतापर्यंत 'बॉईज'च्या तिन्ही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या तिन्ही भागांमध्ये काहीतरी सरप्राईस होतं. 'बॉईज ४' मध्येही असंच सरप्राईज आहे. प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम पाहूनच आम्हाला 'बॉईज ४' करण्याची प्रेरणा मिळाली. मला खात्री आहे, हा चित्रपटही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज', 'बॉईज 2' ला जसा प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच प्रेम प्रेक्षकांनी 'बॉईज 3'लाही दिले. बॉईज 3 ला मिळालेल्या यशानंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉईज 4 या आगामी चित्रपटाची घोषणा बॉईज तीनच्या सक्सेस पार्टीमध्येच केली होती. 'बॉईज 3'ला मिळालेले यश साजरे करण्यासाठी सक्सेस पार्टी गेल्यावर्षी ठेवण्यात आली होती. या पार्टीत चित्रपटाच्या चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. नुकतच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.