प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा आणि नवा अंदाज, सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली अभिनेत्री

अभिनेत्री प्राजक्तामाळी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते. नुकतीच प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे.

Updated: Sep 6, 2023, 12:50 PM IST
प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा आणि नवा अंदाज, सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली अभिनेत्री title=

मुंबई : अभिनेत्री प्राजक्तामाळी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते. नुकतीच प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे. एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत प्राजक्ताने ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. लवकरच प्राजक्ताचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'तीन अडकून सिताराम' नुकताच या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाचं जबरदस्त टिझर सोशल मीडियावर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचेच उत्तर आपल्याला २९ सष्टेंबरला चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केलं आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.

टिझरमध्ये वैभव तत्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे राजकीय कुटुंबातील असून आलोक त्यांचा मित्र आहे. हॅाटेलमध्ये हे त्रिकुट गोंधळ घालताना दिसत आहेत. 'दुनिया गेली तेल लावत' असा काहीसा ॲटिट्यूड असणाऱ्या त्यांच्या आयुष्यात काहीतरी वादळ आल्याचं दिसत असून हे वादळ कसं निवळणार हे पाहाणे औस्तुक्याचं ठरणार आहे. टिझर पाहता कलाकारांची ही दमदार फळी आपल्या भन्नाट अभिनयाने चित्रपटात अधिकच रंगत आणणार आहेत. टिझरमध्ये वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे दिसत असले तरी चित्रपटात आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, नावावरून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, नेमका हा चित्रपट आहे तरी काय? तर टिझरवरून प्रेक्षकांना अंदाज आला असेलच. यात काही रहस्य आहेत, गुंतागुंत आहे आणि हा गुंता अखेर सुटणार का? हे यात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. 'तीन अडकून सीताराम'चा खरा अर्थ प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल.''