मुंबई : 'पद्मावत' सिनेमाची जादू कायम
एका बाजूला जो सिनेमा रिलीज होणार की नाही हा प्रश्न होता तिकडे पद्मावत सिनेमा आपली हटके बाजू सिद्ध करत आहे. बॉक्स ऑफिसवर पद्मावत सिनेमाची पकड कायम राहिली आहे. 2018 मध्ये अगदी धमाकेदार सुरूवात करणारा संजय लीला भन्साळीचा हा सिनेमा ठरला आहे.
#Padmaavat is in no mood to slow down, despite multiple films [new as well as holdover titles] cutting into the market share... [Week 4] Fri 1.75 cr. Total: ₹ 269.50 cr. India biz... Note: Hindi + Tamil + Telugu.
— taran adarsh (@taran_adarsh) February 17, 2018
आतापर्यंत या सिनेमाने केलेली कमाई वाचून कुणालाच विश्वास बसणार नाही की, या सिनेमाला करणी सेनेकडून एवढा विरोध झाला होता. या सिनेमाने आतापर्यंत 200 करोड रुपयांची कमाई केली आहे. 16 फेब्रुवारी रोजी पद्मावत हा सिनेमा चौथ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. चौथ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी पद्मावतने 1.75 करोड रुपयांची कमाई केली असून आतापर्यंत 269.50 करोड रुपये आतापर्यंत जमा झाले आहे. यामध्ये हिंदी, तामिळ आणि तेलगु भाषांच्या बिझनेसचा देखील समावेश आहे.
#Padmaavat biz at a glance...
Week 1: ₹ 166.50 cr
Week 2: ₹ 69.50 cr
Week 3: ₹ 31.75 cr
Total: ₹ 267.75 cr
India biz.
Note: Includes all 3 versions - Hindi + Tamil + Telugu.
SUPER-HIT.— taran adarsh (@taran_adarsh) February 16, 2018
25 जानेवारी रोजी संजय लीला भन्साळीने अनेक विरोधानंतर पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित केला. करणी सेनेने या सिनेमाला अनेक राज्यात प्रदर्शनाला विरोध केला होता. एवढं सगळं असताना सिनेमा नव नवे रेकॉर्ड केले आहेत.