मुंबई : गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना व्हायरसचं सावट आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व सिनेमागृह बंद करण्यात आले होते. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. सिनेमागृह देखील आता सुरू करण्यात आले आहेत. कोरोना संकट नष्ट झालं नसलं तरीही सिनेमा चाहत्यांनी 'रूही' सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रूपेरी पडद्यावर मोठ्या कालावधीनंतर प्रदर्शित झाला आहे. 'रूही' सिनेमाने अनेक प्रेक्षकांना सिनेमागृहाच्या दिशेने ओढून आणलं आहे.
सिनेमा विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाच्या कमाईचा आकडा सांगितला आहे. रूही सिनेमाने आतापर्यंत 8.73 कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. शनिवारी सिनेमाने 3.42 कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. आता 'रूही' चित्रपट 10 कोटी रूपयांचा आकडा पार करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
#Roohi gathers momentum as the weekend sets in... Multiplexes are key contributors... Substantial growth on Sat gives hope... Double-digit *extended* opening weekend is confirmed... Thu 3.06 cr [#MahaShivratri], Fri 2.25 cr, Sat 3.42 cr. Total: ₹ 8.73 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) March 14, 2021
‘स्त्री’ चित्रपटानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूर ‘रुही’ सिनेमाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'रूही' चित्रपट 11 मार्चला रूपेरी पडद्यावर दाखल झाला. आता 'रूही' सिनेमा किती कोटी रूपयांपर्यंत मजल मारेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.