'भूमी' चित्रपटाच्या वरचढ ठरला 'न्यूटन... '

 बॉलिवूडमध्ये पुनरागम केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर संजय दत्तचा 'भूमी' तर एकीकडे राजकुमार रावचा  'न्यूटन' हा चित्रपट २२ सप्टेंबरला प्रदर्शित झाला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 25, 2017, 06:14 PM IST
'भूमी' चित्रपटाच्या वरचढ ठरला 'न्यूटन... ' title=

नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये पुनरागम केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर संजय दत्तचा 'भूमी' तर एकीकडे राजकुमार रावचा  'न्यूटन' हा चित्रपट २२ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. 'न्यूटन' चे नामांकन अगदी ऑस्करपर्यंत पोहचले आहे. परीक्षकांनी देखील 'न्यूटन' या चित्रपट चांगला असल्याचे म्हटले आहे तर भूमी हा चित्रपट परीक्षकांच्या फारसा पसंदीस उतरलेला नाही. त्यामुळेच की काय 'न्यूटन'ची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे. 

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांच्या नुसार रविवारी 'न्यूटन' या चित्रपटाची कमाई ३.४२ इतकी होती. चित्रपटाने पहिल्या दिवशी ९६ लाख, दुसऱ्या दिवशी २.५२ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३.४२ कोटी इतकी कमाई केली. अशाप्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत एकूण ६.९० इतकी कमाई केली आहे. 
तरण आदर्श यांच्या नुसार चित्रपटात रविवारी ३५.७१% इतकी वाढ झाली आणि या आठवड्यात हा चित्रपट अधिक चांगला चालेल, अशी अपेक्षा आहे. 

संजय दत्तच्या भूमी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, रविवारी या चित्रपटाची कमाई होती २.७६ कोटी. या चित्रपटाने शुक्रवारी २.२५ कोटी, शनिवारी २.४७ कोटी आणि रविवारी २.७६ कोटी इतकी कमाई केली. म्हणजे एकूण तीन दिवसाची कमाई आहे ७.४८ कोटी. 

'न्यूटन' हा चित्रपट देशभरात ३५० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला. परंतु, तरण आदर्शच्या नुसार हा चित्रपट ४३० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. तर 'भूमी' हा चित्रपट देशभरात १८९४ स्क्रीन्सवर तर बाहेर २४० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.