अखेर जान्हवीच्या होण्याऱ्या नवऱ्याबाबत बोनी कपूर यांचा खुलासा, म्हणाले...

Boney Kapoor on Janhvi Kapoor relationship : बोनी कपूर यांनी जान्हवी कपूरच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी केला खुलासा...

दिक्षा पाटील | Updated: Mar 31, 2024, 06:16 PM IST
अखेर जान्हवीच्या होण्याऱ्या नवऱ्याबाबत बोनी कपूर यांचा खुलासा, म्हणाले... title=
(Photo Credit : Social Media)

Boney Kapoor on Janhvi Kapoor relationship : बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही देखील एक अभिनेत्री आहे. जान्हवी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेले तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीचं खासगी आयुष्य हे जास्त चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.  

बोनी कपूर यांनी ही मुलाखत 'झूम'ला दिली होती. यावेळी त्यांनी बोलता बोलता जान्हवी आणि शिखर एकत्र असल्याचा खुलासा केला. बोनी कपूर म्हणाले, "मला शिखर खूप आवडतो. जेव्हा तो जान्हवीसोबत नव्हता, तेव्हा पासून मी त्याला ओळखतो. मी आणि शिखर मित्र होतो. पण आता जान्हवी आणि शिखर गेल्या काही वर्षांपासून सोबत आहेत. जेव्हा जान्हवी आणि शिखर रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मला हे जाणवलं होतं की शिखर कधीच जान्हवीचा एक्स होणार नाही. मला माहित होतं की ते दोघं नेहमीच सोबत राहणार. शिखर कधीच जान्हवीला सोडणार नाही. जर त्यांच्यात वाद झालाच तरी शिखर, जान्हवीकडे परत येईल. तर मला माहित होतं की त्यांचं बॉन्ड हे कायमसाठी आहे. "

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे बोनी कपूर म्हणाले, "दोघांमध्ये मैत्री, प्रेम खूप आहे. माझ्यासाठी शिखर नेहमीच उभा राहिला आहे. जान्हवी, अर्जुन, खुशी आणि अंशुला सगळ्यांसोबत शिखर खूप फ्रेंडली राहतो. सगळ्यांनाच शिखर आवडतो. जेव्हा पापाराझी फोटो काढतात तेव्हा शिखरला ते आवडत नाही." 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी म्हणजेच वाढदिवसाच्या दिवशी जान्हवी ही जेव्हा तिरुपतीचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. तेव्हा देखील शिखर तिच्यासोबतच होता. त्याचा एक व्लॉग हा ऑरीनं शेअर केला होता. 

हेही वाचा : बोनी कपूर यांच्यावर रागावलेत अनिल कपूर, भावा-भावांमध्ये का आला दुरावा?

बोनी कपूर त्यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते सध्या 'मैदान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. तर जान्हवी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'मिस्टर अँड मिसेज माही', 'उलझन', 'आरसी 16' आणि 'देवारा: पार्ट 1' या सिनेमांमध्ये झळकणार आहे.