Prasad Oak Comment on Swatantra Veer Savarkar movie : रणदीप हुड्डाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, त्यांचं राजकीय व सामाजिक कार्य दाखवण्यात आले आहे. यात रणदीप हुड्डा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. आता 29 मार्चला हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. आता अभिनेता प्रसाद ओकने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतंच स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला मराठी कलाकारांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. आता याबद्दल अभिनेता प्रसाद ओकने पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे. तसेच त्याने या चित्रपटाचे एक पोस्टरही शेअर केले आहे.
"स्वातंत्र्यवीर सावरकर” अप्रतिम चित्रपट…!!! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी. अतिशय संयत अभिनय. उत्तम पटकथा. देखणं छायाचित्रण. परिणामकारी पार्श्वसंगीत. रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीम चं मनःपूर्वक अभिनंदन…!!! चित्रपट आता “मराठीत” सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र सुबोध भावे यांनी सावरकरांना आवाज दिलेला आहे.
कोणत्याही खोट्या posts कडे लक्ष देऊ नका. चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्तानी पुन्हा एकदा “सावरकरांना” त्रिवार वंदन…!!!! जय हिंद…!!!", असे प्रसाद ओकने म्हटले आहे. सध्या प्रसाद ओकची ही पोस्ट चागंलीच चर्चेत आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने आतापर्यंत 15 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुलनेने कमी प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनपट उलगडण्यात आले आहे. या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे.
आणखी वाचा : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात झळकला 'हा' मराठी अभिनेता, साकारली ब्रिटीश पोलिसांची भूमिका
तर अभिनेत्री अंकिता लोखंडे ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्हीही भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीमध्ये 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांना सुबोध भावेचा आवाज देण्यात आला.