Kangana Ranaut : दुसऱ्यांना रडवणारी कंगना स्वत: का रडली ढसा ढसा?

मी कधीही रडत नाही. मी कोणाला मला रडवण्याचीही संधी देत ​नाही. मी शेवटी कधी रडले हे ही मला आठवत नाही, परंतु आज मी रडले.

Updated: Mar 23, 2021, 06:40 PM IST
Kangana Ranaut : दुसऱ्यांना रडवणारी कंगना स्वत: का रडली ढसा ढसा? title=

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनावतच्या (Kangana Ranaut) 34 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आगामी ‘थलायवी’ (Thalaivi) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात कंगना जयललिताच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात जयललिता यांचा सिनेमा ते मुख्यमंत्री होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलर रिलीजच्या निमित्ताने  कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कंगना दिग्दर्शक ए.एल. विजयबद्दल बोलताना  खूपच भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले होते.

कंगनाने त्या व्हिडिओ कॅप्शन लिहिले की - "मी स्वत:ला बब्बर शेरनी म्हणते कारण मी कधीही रडत नाही. मी कोणाला मला रडवण्याचीही संधी देत ​नाही. मी शेवटी कधी रडले हे ही मला आठवत नाही, परंतु आज मी रडले आणि मला याबद्दल चांगले वाटत आहे."

व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली  की, "माझ्या आयुष्यात अशी कोणतीच व्यक्ती भेटली नाही, जिने मला माझ्या अभिनयाबद्दल वाईट बोलले नाही." एवढं बोलताच ती भावनिक झाली. पुढे ती म्हणाली- "मी भावनिक झाली आहे. सहसा हे माझ्या बाबतीत होत नाही. पण ही एक अशी व्यक्ती आहे ज्याने माझ्या क्षमतेबद्दल चांगले वक्तव्य केले आणि माझ्यावर विश्वास ठेवला आहे."

कंगना पुढे एक अस्पष्ट आवाजात म्हणते की, "पुरुष कलाकारा कधीही  सह  महिला कलाकारांसोबत चांगले वागत नाहित. परंतु एक दिग्दर्शक म्हणून मी त्याच्याकडून  शिकले की,  कलाकारांशी कसे वागावे आणि एक चांगली पार्टनरशीप कशी पुढे घेऊन जाता येईल.