Salman Khan : बॉलिवूडमधील सर्वात महागड्या सुपरस्टारपैकी एक म्हणजे सलमान खान. अभिनेता सलमान खानची अशी ओळख आहे की तो वयाच्या 58 व्या वर्षी देखील तो केवळ नायकाची भूमिका बजावतो आणि चित्रपटासाठी कोटींमध्ये फी घेतो. मात्र, फारच कमी लोकांना हे माहिती असेल की अभिनेता सलमान खानचा पहिला पगार 100 रुपयांपेक्षा कमी होता. परंतु आज तो कोट्यवधींचा मालक आहे.
अभिनेता सलमान खानने 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. मात्र, या चित्रपटात सलमान खानने सहाय्यक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटानंतर अभिनेता सलमान खानला 'मैने प्यार किया' या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटानंतर सलमान खान सुपरस्टार बनला. त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला. या चित्रपटात भाग्यश्रीसोबत सलमान खानची जोडी दिसली होती. या चित्रपटातील सलमान खानची गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली होती.
सलमान खानचा पहिला पगार
अभिनेता सलमान खानने काही दिवसांपूर्वी त्याच्या पहिल्या पगारा विषयी खुलासा केला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता सलमान खानने सांगितले की, त्याचा पहिला पगार हा 100 रुपयांपेक्षा कमी होता. सलमान खानचा पहिला पगार हा 75 रुपये होता. अभिनेत्याने ताज हॉटेलमधील एका कार्यक्रमात बॅकग्राउंडमध्ये डान्स केला होता. माझा एक मित्र तिथे डान्स करत होता. त्याने मलाही बोलावले होते. मी Campa Cola साठी काम केले होते. तेव्हा ते वाढून 750 रुपये झाले. यानंतर सलमान खानने काही दिवस 1500 रुपयांवर काम केले. त्यानंतर अभिनेत्याला 'मैंने प्यार किया'साठी 31 हजार रुपये मिळाले होते. त्यानंतर त्यामध्ये वाढवून मला 75000 रुपये मिळाले.
सलमान खानची एकूण संपत्ती
अभिनेता सलमान खानने 36 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कमाई केली. आज सलमान खान कोट्यवधींचा मालक आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सलमान खानची एकूण संपत्ती 2900 कोटी रुपये आहे. सलमान खान एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त फी घेतो. सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.