बिकिनी लूकमध्ये भाग्यश्रीचं वयही ओळखणं कठीण; बोल्ड अभिनेत्रींवर मात

सौंदर्य आणि अदांच्या बाबतीत तिनं भल्याभल्यांना मागं टाकलं आहे   

Updated: Sep 20, 2021, 11:43 AM IST
बिकिनी लूकमध्ये भाग्यश्रीचं वयही ओळखणं कठीण; बोल्ड अभिनेत्रींवर मात  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सलमान खान (Salman Khan) सोबत 'मैने प्यार किया' या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री हिंदी चित्रपटांमध्ये फार काळ तग धरु शकली नाही. पण, तिच्या या एका चित्रपटानं प्रेक्षकांवर कायमस्वरुपी छाप सोडली. या चित्रपटानं तिला रातोराज प्रसिद्धीझोतात आणणं. आणि हीच लोकप्रियता आजही पाहायला मिळत आहे. 

भाग्यश्रीनं आता वयाच्या 52 वर्षांचा आकडा गाठला आहे. पण, बोल्डनेस, स्टाईल आणि फिटनेसच्या बाबतीत मात्र ती भल्याभल्य़ांना मागे टाकत आहे. हल्लीच सोशल मीडियावर तिनं शेअर केलेले फोटो याचाच प्रत्यय देत आहेत. भाग्यश्रीचे हे फोटो पाहता तिच्या वयाचा अंदाजही लावणं कठीण होत आहे. इतकंच नव्हे तर, वयाच्या या टप्प्यावर कुटुंबाला प्राधान्यस्थानी ठेवूनही तिनं स्वत:ला जपलेलं पाहून अनेक अभिनेत्रींवर ही सौंदर्यवती मात करत आहे असं म्हणायला हरकत नाही. 

भाग्यश्रीनं शेअर केलेल्या तिच्या या स्वीमसूट कम बिकिनी लूकमध्ये ती सुट्ट्यांचा आनंद घेतना दिसत आहे. जांभळ्या रंगाची मोनॉकिनी घालून स्विमींग पूलमध्ये भाग्यश्री तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना आणि फॉलोअर्सना घायाळ करत आहे. 

बॉलिवूड अभिनेत्रींशी तुलना 
भाग्यश्रीच्या या अदा पाहून अनेक नेटकऱ्यांची तिची तुलना सारा अली खान आणि जान्हवी कपूरशी केली आहे. भाग्यश्री फिटनेसच्या बाबतीत बरीच सजग दिसते. योगासनं, व्यायाम आणि पूरक आहार अशा अनेक सवयींमुळं ती हे साध्य करु शकत आहे.