Thappad : ...म्हणून स्वत:च्याच चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी आणण्याची तापसीची मागणी

'बस.... इतनी सी बात नही है'

Updated: Feb 12, 2020, 01:53 PM IST
Thappad : ...म्हणून स्वत:च्याच चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी आणण्याची तापसीची मागणी  title=
तापसी पन्नू

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू हिने कायमच काही आव्हानात्मक विषय हाताळत चित्रपटांच्या माध्यमातून महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही अभिनेत्री 'थप्पड' Thappad  या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्य़ा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये तापसीच्या दमदार अभिनयासोबतच एका दमदार कथानकाची झलक प्रेक्षकांना पाहता आली. पण, आता मात्र या ट्रेलरवर बंदी आणण्याची मागणी करणयात येत आहे. 

तापसीच्या या दमदार चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी आणण्याची मागणी केली जात असल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बरं, यामध्ये आणखी एक कारण ठरत आहे. ते म्हणजे खुद्द तापसीनेच ही भलती मागणी केली आहे. 'थप्पड'च्या दुसऱ्या ट्रेलरच्या निमित्ताने त्यावर बंदी आणण्याचा विषय तिने छेडला आहे. 

एका महिलेला मारलेली 'थप्पड' ही काही साधीसुधी बाब नाही. त्यामुळे युट्यूब नियमांनुसार हा व्हिडिओ हिंसा भडकवणारा असल्याची बाब निदर्शनास आणत तो व्हिडिओ 'रिपोर्ट' करण्याचं आवाहन तिने केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचाच काही भाग पोस्ट करत, त्यामध्ये तापसीच्या 'थप्पड'पर्यंतचं दृश्य दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये पुढे काय होणार याची वाट पाहताय तुम्ही? असा प्रश्न ती विचारत आहे. 

चित्रपटाचा ट्रेलर असला तरीही, अशा प्रकारच्या व्हिडिओला इंटरनेटवर काहीच स्थान दिलं नाही पाहिजे असं म्हणत स्वत:च्याच चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी आणण्याची मागणी करत तापसीने स्वत:पासूनच एक वेगळी सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने का असेना, पण घरगुती हिंसेला बळी पडणाऱ्या महिला आणि घराच्या कोपऱ्यांत, कुटुंबीयांच्या, नात्यांच्या गर्दीत ऐकूही न येणाऱ्य़ा त्यांच्या भावनांना तिने वाचा फोडण्याचा प्रभावशाली प्रयत्न सुरु केला आहे. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

२८ फेब्रुवारीला तापसीचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये रत्ना पाठक शाह, तन्वी आजमी आणि राम कपूर हे कलाकारही झळकणार आहेत. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.