'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा. 

Updated: Feb 5, 2019, 12:38 PM IST
'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं  title=

मुंबई : 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा. 

चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश यांनी या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतल्यानंतर कंगानाने चित्रपटाच्या सहदिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. ज्यानंतर सोनूने या चित्रपटातून काढता पाय घेतला होता. पुढे या चित्रपटाच काम न करण्याची संधी मिळाल्याची खंत त्याने व्यक्त केली होती. 

'चित्रपटातील एका कलाकाराच्या दिग्दर्शनात मी काम का करावं? मी क्रिश यांच्या दिग्दर्शनाअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात काम करण्यासाठीचा प्रस्ताव स्वीकारला होता. जर ते या चित्रपटाचा भाग नसतील तर मीसुद्धा चित्रपटाचा भाग नसेन', असं वक्तव्य त्याने चित्रपटाच्या सेटवर केल्याचं म्हटलं गेलं होतं. त्याची ही भूमिका पाहता एका महिलेच्या दिग्दर्शनाअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात काम न करण्याच्या निर्णयामुळे त्याने चित्रपटातून काढता पाय घेतल्याचं कंगनाने स्पष्ट केलं होतं. इतकच नव्हे तर, काही मतभेदांमुळे त्याने चित्रपट सोडला याचीसुद्धा चर्चा झाली. हा सर्व प्रकार आणि सुरु असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देत कंगनाने सोनूला चांगलच धारेवर धरलं आहे. 

'इंडियन एक्सप्रेस'शी संवाद साधताना तिने सोनूला झापलं. 'या चित्रपटाविषयी बोलण्याचा सोनू सूदला काहीच अधिकार नाही. त्याचा करारच मोडीत काढल्यामुळे त्याने वक्तव्यच करु नये. चित्रपटात कोणत्याच प्रकारचं योदगान नाही, मग तो या चित्रपटाची प्रतिमा का मलिन करत आहे?', असा प्रश्न तिने उपस्थित केलं. चित्रपटाचा भाग असल्याचं हे भासवूच कसे शकतात, असं म्हणत परिस्थिती आणखी चिघळवण्याची सोनूची भूमिका धक्कादायक असल्याचं म्हणत ही वेळ या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत  चित्रपटाचं यश साजरा करण्याची असल्याच्या मुद्द्यावर तिने भर दिला.