पोलीस अधिकारी 'पीटी टीचर'च्या प्रेमात; लग्नानंतरचं गुपित सर्वांसमोर येताच बसला धक्का

याला प्रेम म्हणावं का, हाच प्रश्न उभा राहिला आहे.   

Updated: Jan 25, 2022, 04:19 PM IST
पोलीस अधिकारी 'पीटी टीचर'च्या प्रेमात; लग्नानंतरचं गुपित सर्वांसमोर येताच बसला धक्का  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : असं म्हणतात प्रेमाची कोणती अशी निश्चित परिभाषा नाही. प्रेम कधीही कुठेही आणि कोणावरही होऊ शकतं. फक्त ते करण्यासाठी एक निस्वार्थ मन असणं तेवढं गरजेचं. आजवर प्रेम आपल्यासमोर कित्येक रुपांतून आलं आहे. पण, आता अशा प्रेमाची चर्चा होतेय ज्याला प्रेम म्हणावं का, हाच प्रश्न उभा राहिला आहे. 

व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून लक्षात तर येतंय की एक पोलीस अधिकारी एका पीटी टीचर अर्थात़ शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिकेच्या प्रेमात पडतो. 

तिच्याशी लग्न करण्यासाठी तिचं मनही वळवतो. लग्नही होतं आणि पुढे.... 

खरं वळण तर पुढे येतं, जेव्हा सर्व नातेवाईक या जोडीकडून गुडन्यूज केव्हा मिळणार असा प्रश्न करु लागतात.

हा व्हिडीओ आहे एका बॉलिवूड चित्रपटाच्या ट्रेलरचा. अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे 'बधाई दो'. 

ज्याप्रमाणे 'बधाई हो' या चित्रपटातून एका वेगळ्या विषयाला हाताळलं गेलं होतं. अगदी त्याचप्रमाणे या चित्रपटातूनही एक नवा आणि बऱ्य़ाच अंशी न्यूनगंड असणारा विषय हाताळला गेला आहे. 

नात्यांची गुंतागुंत आणि त्यातून आकारास येणाऱ्या नव्या नात्यांभोवती, अर्थात समलैंगिक संबंधांभोवती फिरणारा आणि सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 

हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटाकडून चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. राजकुमार आणि भूमीशिवाय चित्रपटात सीमा पाहवा, शीबा चड्ढा, लवलीन मिश्रा, नितीश पांडे, शशी भूषण अशा कलाकारांची वर्णी लागली आहे.