Bollywood Actress Rekha : बॉलिवूडमधील (Bollywood) 80 च्या दशकातील अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर रेखाचं (Rekha) नाव सर्वात वर येतं. ती एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच पण तिचे सौंदर्यही अतुलनीय आहे. रेखा 68 वर्षाची जरी असली तर तिच्या सौंदर्याने ती सगळ्यांनाच घायाळ करते. वयाच्या या टप्प्यावरही तिचं सौंदर्य आजही अनेकांना घायाळ करतं. (Bollywood Gossips Rekha mother addicted to gambling While Rekha family is on the verge of destruction Amitabh Bachchan nz)
1954 मध्ये चेन्नईमध्ये (Chennai) जन्मलेल्या रेखाचं संपूर्ण आयुष्य वादांनी वेढलेलं आहे. फिल्मी करिअरमध्ये (Film career) रेखाचं (Rekha) नाव अनेक लोकांशी जोडले गेले. रेखाचे बालपणही वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळते. रेखाच्या आईला दारूचे (Alcohol) व्यसन होते त्यामुळे रेखाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. रेखा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. रेखा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती अनेक रिअॅलिटी शो आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये दिसली आहे. एकेकाळी रेखाचा एक लूक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. रेखाच्या बालपणाशी संबंधित अनेक किस्से आहेत जे कदाचितच कोणाला माहित असतील.
14 वर्षांची असताना रेखाने काम करायला सुरुवात केली. प्रसिद्ध लेखक यासिन उस्मान यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. यासीन उस्मानने रेखावर एक पुस्तक लिहिले आहे. 'रेखा किसी पहेली जिंदगानी' असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकात रेखाशी संबंधित अनेक कथा आहेत. या पुस्तकात रेखाबद्दल अनेक गोष्टी आहेत. रेखाच्या वडिलांबद्दल बोलायचे झाले तर रेखाचे वडील जेमिनी गणेशन हे तमिळ चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध होते.
रेखाची आई पुष्पावलीबद्दल सांगायचे तर, पुष्पावली ही तेलुगू चित्रपटांतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आणि रेखाचे वडील जेमिनी गणेशन हे साऊथचे सुपरस्टार होते. पुष्पावली ही जेमिनी गणेशनची तिसरी पत्नी होत्या. रेखा आणि पुष्पावलीचे नाते चांगले चालले नव्हते. तर पुष्पावलीने आपल्या मुलींचा स्वीकार केला नाही.
रेखाच्या आईला जेमिनी गणेशनचे लग्न झाल्याचे कळले तेव्हा तिला ते सहन झाले नाही. यानंतरच पुष्पावलीला दारू आणि घोड्यांवर पैसे खर्च करण्याची सवय लागली. त्यांच्या या सवयीने त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. यानंतरही रेखाच्या आईने रेखाला काम करण्यास भाग पाडले. सेटवर न गेल्याने रेखाला अनेकदा मारहाणही सहन करावी लागली. रेखाने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की- तिला चित्रपटात काम करायचे नव्हते.