आघाडीच्या दिग्दर्शकांकडून बॉलिवूडमधून एकाएकी काढता पाय

अनेकांसाठीच हा धक्का

Updated: Jul 22, 2020, 01:45 PM IST
आघाडीच्या दिग्दर्शकांकडून बॉलिवूडमधून एकाएकी काढता पाय  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या, बॉलिवूडमधील नावाजलेल्या दिग्दर्शकानं अचानक या कलाविश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी केलेलं एक ट्विट सध्या अनेकांच्याच भुवया उंचावत काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित करत आहे. 

बॉलिवूडमधून बाहेर पडणाऱ्या या दिग्दर्शकाचं नाव आहे, अनुभव सिन्हा. आपण बॉलिवूडमधून राजीनामा देत बाहेर पडत असल्याचं ट्विट सिन्हा यांनी केलं. हे आता खूप झालं आता. मी बॉलिवूडलाच राजीनामा देत आहे. याचा अर्थ काय लागायचा तो लागो... असं ट्विट त्यांनी केलं. इतकंच नव्हे, तर त्यांनी ट्विट हँडलमध्ये 'नॉट बॉलिवूड', असंही लिहिलं. 

'आर्टिकल १५', फेम दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत सुधीर मिश्रा यांनीही ट्विट करत त्यांच्या मते ब़ॉलिवूड म्हणजे काय असा प्रश्न विचारला. त्यांनी ट्विट करत लिहिलं, 'बॉलिवूड काय आहे? मी तर इथे सत्यजित रे, राज कपूर, गुरु दत्त, ऋत्विक घटक, बिमल रॉय, मृणाल सेन, ऋषिकेश मुखर्जी, के आसिफ, आनंद, जावेद अख्तर, तपन सिन्हा, गुलजार, शेखर कपूर, केतन मेहता, भारतन आणि अरविंदन यांच्यापासून प्रेरित होऊन या कलाविश्वाता भाग होण्यासाठी आलो होतो. मी कायमच तेथे होतो'.

मिश्रा यांच्या या ट्विटला उत्तर देत अनुभव सिन्हा यांनी लिहिलं, चला आता बॉलिवूडपासून दूर, हिंदी चित्रपट साकारुया. त्यांनी लिहिलं, 'चलो दो लोग BOLLYWOOD से बाहर। अपन हिंदी फ़िल्म इंडस्ट्री में रह के फ़िल्में बनाएँगे।'. यह ले अपनी लकुटी कम्बरिया, बहुतही नाच नचायो।. एकिकडे सिन्हा आणि मिश्रा यांचे हे ट्विट चर्चेचा विषय ठरत असतानाच दुसरीकडे हंसल मेहता यांनीसुद्धा बॉलिवूडमधून काढता पाय घेण्याता निर्णय घेतला. 'सोडलं.... हे कधीच प्रथम स्थानावर नव्हतं....', असं ट्विच त्यांनी केलं. 

 

मेहता यांच्या या ट्विटनंतर सिन्हा यांनीही लगेचच प्रतिक्रिया दिली. गेल्या काही काळापासून, विशेषत: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कलाविश्वामध्ये घराणेशाहीच्या मुद्द्याला चांगलीच हवा मिळाली होती. ज्यानंतर अनेक कलाकारांनी या विषयावर त्यांची मतं मांडली.