'तू लीड रोल करु शकतेस, पण मला...' अभिनेत्रीचा या प्रसिद्ध डायरेक्टरवर गंभीर आरोप

बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेचं धक्कादायक वास्तव, या अभिनेत्रीने केली पोलखोल

Updated: Oct 13, 2022, 05:36 PM IST
'तू लीड रोल करु शकतेस, पण मला...' अभिनेत्रीचा या प्रसिद्ध डायरेक्टरवर गंभीर आरोप title=

Dark Side of Bollywood : बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. ;दीया और बाती' फेम अभिनेत्री कनिष्का सोनी (Kanishka Soni) हिने अभिनेता आणि बिग बॉस 16 (Big Boss 16) तील स्पर्धक साजिद खानविषयी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. कनिष्काने साजिद खानवर (Sajid Khan) लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप केला आहे. याबरोबरच कनिष्काने फिल्म इंडस्ट्रातील (Film Industry) काळी बाजू जगासमोर आणली आहे. 

साजिद खानवर कनिष्काचे गंभीर आरोप
सिनेमात काम मिळवण्यासाठी काय करावं लागतं, याचा धक्कादायक खुलासा कनिष्काने केला आहे. एका सिनेमासाठी साजिद खानने कनिष्काला बोलावलं होतं. यावेळी त्याने केलेली मागणी ऐकून कनिष्काला मोठा धक्काच बसला. साजिद खानने सांगितलं 'तुझी उंची आणि फिगर चांगला आहे. तू लीड रोल करु शकतेस, फक्त टी-शर्ट वरती करुन तुझं पोट दाखवं, मला तुझं शरीर बघायचं आहे' हे ऐकून मला धक्काच बसला. मी घाबरले, मी विचारही नव्हता केला की सिनेमात भूमिका मिळवण्यासाठी हे सर्व करावं लागतं. मी उच्च शिक्षण घेतलं आहे, आणि त्या जोरावर मी काहीतरी चांगलं करु शकते. स्टार बनण्यासाठी मला हे असं काही करण्याची गरज नाही,असं कनिष्काने सांगितलं.

इंडस्ट्रीतला कटू अनुभव
या गोष्टीला काही दिवस गेल्यानंतर साजिद खानचा स्वभाव बदलला असेल असं मला वाटलं. मी त्यातली मुलगी नाही हे त्याला कळलं असेल, पण त्याच्या स्वभावात काहीही बदल झाला नव्हता. फिल्म इंडस्ट्रीत एखादा चांगला प्रोड्यूसर-डिरेक्टर भेटेल अशी मला अपेक्षा होती, पण दुर्देवाने असा एकही व्यक्ती मला भेटला नाही. प्रत्येकाला माझ्याकडून तशी अपेक्षा होती. एका रात्रीत लीड अभिनेत्री बदलून प्रोड्यूसर किंवा डिरेक्टरच्या गर्लफ्रेंडला ती भूमिका दिली जाते. या सर्व गोष्टी खूपच भयानक आहेत, गेली 15 वर्ष आपण याचा सामना करतोय, पण आता माझ्यात ताकद नाही असं कनिष्काने सोनीने म्हटलं आहे.

मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala), सुशांत सिंह राजपूत (Sushant Sinh Rajput) किंवा सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचा शेवट पाहून भीती वाटते, इंडस्ट्रीतल्या मोठ्या माणसांवर आपण आरोप केले आहेत, पुढे माझ्याबरोबर पण असं होऊ शकतं, अशी चिंताही कनिष्काने व्यक्त केली आहे. 

कनिष्का बिग बॉसमध्ये येणार?
बिग बॉसमध्ये येऊन साजिद खानच्या कृत्यांबद्दल सांगणार का या प्रश्नावर उत्तर देताना कनिष्काने बिग बॉसमध्ये संधी मिळाली तर भारतात परतणार नसल्याचं सांगितलं. मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जाईल कारण मी इतक्या मोठ्या लोकांवर आरोप केले आहेत, मला भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, कारण प्रसिद्धी आणि पैशांसाठी हे सर्व केल्याचा आरोपही माझ्यावर केला जाईल असंही कनिष्काने सांगितलं.

कनिष्काने देश सोडला
कनिष्का देश सोडून आता परदेशात रहाते. साजिद खानची लायकी काय आहे, त्याला बिग बॉस कार्यक्रमात सहभागी करुन का घेतलं असे प्रश्न कनिष्काने उपस्थित केले आहेत. मी बिग बॉस कधीच बघितलं नाही, पण जगभरातील लोकं हा कार्यक्रम बघतात, त्यामुळे योग्य लोकांची निवड करायली हवी, असंही कनिष्काने म्हटलं आहे.