धक्कादायक! बॉलिवूड सेलिब्रिटी मॅनेजरची आत्महत्या

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट...

Updated: Jun 9, 2020, 10:29 PM IST
धक्कादायक! बॉलिवूड सेलिब्रिटी मॅनेजरची आत्महत्या title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सॅलियनने हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दिशाने इमारतीच्या 14व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी दिशाच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप याप्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आलेली नाही.