ना कपडे उतरविले, ना दिग्दर्शकाशी संबंध ठेवले; नर्गिस हिने सांगितले का नाही मिळाले प्रोजेक्ट

बॉलिवूडमध्ये (Bollywood) करिअर करताना काय काय करावे लागते, याचा धक्कादायक खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे. 

Updated: Aug 7, 2021, 08:27 AM IST
ना कपडे उतरविले, ना दिग्दर्शकाशी संबंध ठेवले; नर्गिस हिने सांगितले का नाही मिळाले प्रोजेक्ट title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) करिअर करताना काय काय करावे लागते, याचा धक्कादायक खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यासोबत 'रॉकस्टार' (Rockstar) चित्रपटात दिसलेली नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) सध्या चर्चेतील अभिनेत्री ठरली आहे. नर्गिस फाखरी हिच्या नव्या सिनेमातील कामाचे खूप कौतुक झाले आणि असे म्हटले गेले की ती या फिल्म जगतात खूप पुढे जाईल. मात्र, ती बॉलिवूडमध्ये पुढे न जाता मागेच राहिली आहे. नर्गिस ही काही सिनेमामध्ये दिसली आणि त्यातूनही तिला विशेष लोकप्रियता मिळाली नाही.

नर्गिस हिने केले धक्कादायक खुलासे 

कॉस्मेटिक सर्जरीपासून कास्टिंग काउचपर्यंत, नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) अशा सर्व मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलली आहे. आता एका मुलाखतीत तिने सांगितले आहे की, तिची कारकीर्द कोणत्या उंचीवर पोहोचू शकत नाही. आपण स्टार अभिनेत्रीचे स्वप्त पाहिले होते. मात्र, काही गोष्टीमुळे ते शक्य होताना दिसत नाही. माजी एडल्ट फिल्म स्टार ब्रिटनी डी ला मोरा यांच्याशी झालेल्या संभाषणात नर्गिस फाखरी यांनी आपल्या कारकीर्दीत आलेल्या अडचणींविषयी सांगितले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

मी कोणत्याही दिग्दर्शकासोबत झोपले नाही

या मुलाखतीत नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) म्हणाली, 'मी एखाद्या गोष्टीची भूखी आहे? मला प्रसिद्धीची भूक नाही की मी नग्न पोझ द्यावी, किंवा दिग्दर्शकाबरोबर झोपावे. नर्गिस फाखरीने या मुलाखतीत सांगितले की तिने अनेक संधी गमावल्या. कारण अनेक गोष्टी होत्या, ज्यासाठी तिने सरळ नकार दिला होता. तिच्यासाठी मनाला ते न पटणारे होते.

मागे राहण्याचे कारण काय सांगितले की...

नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) म्हणाली की, ती अशा ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत आहे जिथे तिच्याकडे उच्च दर्जा आहे. तिने पुढे सांगितले की, तिला या गोष्टींबद्दल खूप वाईट देखील वाटते. कारण अशा गोष्टींमुळे अनेक मोठे प्रकल्प तिच्या हातातून निसटले. मला वाईट वाटले, पण मी स्वतःला सांगत राहिली की, जे त्यांच्या तत्त्वांना चिकटून राहतील तेच शेवटी जिंकतील आणि टिकून राहतील.

'जेव्हा नग्न शॉट्सची लोक मागणी करू लागले'

नर्गिस फाखरी (Nargis Fakhri)हिने या मुलाखतीत सांगितले की, तिला बऱ्याच वेळा टॉपलेस आणि नग्न शॉट्ससाठी विचारण्यात आले. पण तिला या गोष्टींबाबत ते योग्य वाटले नाही. ती म्हणाली, 'मला आनंद आहे की मी बॉलिवूडमध्ये आहे. कारण तुम्ही इथे इंटीमेट सीन्स करत नाही. माझ्या मॉडेलिंगच्या दिवसात अनेक वेळा मला टॉपलेस आणि नग्न शॉट्ससाठी विचारण्यात आले. पण मला या गोष्टींबाबत ते योग्य वाटत नाही.