अमिताभ बच्चन यांची राजकारणात उडी? अचानक अयोध्या वारीची घोषणा केल्याने चर्चांना उधाण

बॉलिवूडचा शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेने अमिताभ बच्चन अयोध्येत चाललेत की काय अशीच चर्चा आता रंगू लागलीय.  

Updated: May 16, 2022, 04:14 PM IST
अमिताभ बच्चन यांची राजकारणात उडी? अचानक अयोध्या वारीची घोषणा केल्याने चर्चांना उधाण  title=

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना अयोध्या वारीचे वेध लागलेय. प्रत्येक पक्ष मोठ-मोठ्या सभा घेऊन आपापल्या अयोध्या वारीचे तारीख जाहीर करतायत. त्यात  मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या प्रकरणावरून मनसेचे प्रतिउत्तरात हनूमान चालिसा लावण्याचे प्रकरण, यामुळे संपूर्ण राज्य 'जय श्री राम', 'चलो अयोध्या' या घोषणांनी दणाणलय. अशातच आता बॉलिवूडचा शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेने अमिताभ बच्चन अयोध्येत चाललेत की काय अशीच चर्चा आता रंगू लागलीय.  

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बिग बी नेहमीच त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. काल रविवारी त्यांनी अशाच प्रकारे चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यासाठी बच्चन यांनी सकाळी 11:36 वाजता त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्यांनी "FB 3294 - शुभ प्रभात!" असा मेसेज लिहला. या मेसेजसोबत त्यांनी त्यांनी हात जोडण्याचा इमोजीही पोस्ट केला होता.  

इतक्या उशिरा शुभेच्छा देणे बच्चन यांना महागात पडले. अनेक यूजर्सनी त्याच्यावर टीका केली. तर हरी ओम पांडे नामक एका यूजरने बच्चन यांना जय श्री राम लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावर बच्चन यांनीही खास प्रतिक्रिया दिली. हरिओम पांडे  'बोल सिया पति रामचंद्र की जय' अशी प्रतिक्रिया त्यांनी युझरला दिली.  
बच्चन यांच्या या कमेंटला हजारो लोकांनी लाईक केले आहे.  

महाराष्ट्रातील राजकारणात जय श्री रामच्या घोषणा देत अयोध्या वारीची यात्रा काढली जात असताना, बच्चन यांनी युझरला दिलेले उत्तर ही अयोध्या वारीची आठवण करून देत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या अयोध्या वारीची चर्चा सुरु आहे.मात्र प्रत्यक्षात ते कुठेही जात नाही आहेत. बच्चन यांनी चाहत्याने दिलेल्या कमेंटला उत्तर देण्यासाठी त्याच इमोशनमध्ये कमेंट केले आहे.