इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन्स देणारी 'ही' अभिनेत्री आता दिसते अशी

बोल्ड सीनच्या बळावर चित्रपट गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीचे आताचे फोटो पाहून तूम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही 

Bollywood Life | Updated: Jul 10, 2022, 03:07 PM IST
इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन्स देणारी 'ही' अभिनेत्री आता दिसते अशी  title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर चित्रपटसृष्टी सोडली. या लिस्टमध्ये अनेक अभिनेत्रींची नावे येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने अभिनेता इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन दिले होते. चित्रपटातील या दोघांच्या इंटीमेट सीनची खुप चर्चा रंगली होती. ही अभिनेत्री नेमकी आहे कोण आणि ती कशी दिसते ते जाणून घेऊयात.  

अभिनेत्री उदिता गोस्वामी ही उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ज्यावेळेस बॉलिवूडमध्ये इमरान हाश्मीच्या चित्रपटाची क्रेझ होती. त्याचवेळेस अभिनेत्री उदिता गोस्वामी चर्चेत आली होती. तिने इमरान हाश्मीसोबत अनेक चित्रपटात बोल्ड सीन्स दिले होते. या सीनचे प्रेक्षक खुपच वेडे झाले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Udita Goswami (@uditaagoswami)

उदिता गोस्वामीने फार कमी चित्रपटांमध्ये काम केले, पण तिने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. उदिता गोस्वामीने इमरान हाश्मीसोबत 'जहरे' आणि 'अक्सर' सारख्या चित्रपटात काम केले होते. त्याने जॉन अब्राहमसोबत 'पाप' चित्रपटातही बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटातील तिची जॉनसोबतची केमिस्ट्रीही खूप आवडली होती. 

उदिताने लवकरच लग्न केले आणि नंतर फिल्मी जग सोडले.चित्रपट सृष्टीतून बाहेर पडल्यानंतर आता खऱ्या आयुष्यात खूप बदलली आहे. अभिनेत्रीचा फोटो पाहून लोकांचा विश्वास बसत नाही की हीच उदिता गोस्वामी आहे जी पूर्वी आपल्या बोल्ड अॅक्ट्सने प्रेक्षकांना घायाळ करायची.  

दिग्दर्शक मोहित सूरीसोबत उदिताच्या अफेअरची चर्चा सुरू होती. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर तिने २०१३ मध्ये मोहितसोबत लग्न केले. मोहित आणि उदिता यांनाही दोन मुले आहेत.