मुंबई : बॉलिवूड म्हणजे जणू एक भलंमोठं कुटुंब, असं अनेक कलाकार म्हणताना दिसतात. याच कुटुंबात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी जोड्या सध्या त्यांच्या नात्यावर लग्नाचं शिक्कामोर्तब करु लागल्या आहेत.
हल्लीच अभिनेता राजकुमार राव यानं जवळपास 11 वर्षांनंतरच्या नात्यानंतर प्रेयसी पत्रलेखा पॉल हिच्याशी लग्नगाठ बांधली. (Alia ranbir)
तिथे विकी कौशल आणि कतरिना कैफ (Vicky kaushal katrina kaif) यांच्या लग्नच्या चर्चांनाही उधाण आलं आहे.
रणबीर आणि आलियाही नव्या वर्षाच्या सुरुवातीला विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पण, इथं त्यांच्या या लग्नाच्या कहाणीमध्ये एक ट्विस्ट आला आहे. हा ट्विस्ट पाहता रणबीर- आलियाच्या लग्नावर याचे थेट परिणाम होत असल्याचं दिसत आहे.
थोडक्यात रणबीर आलियाचं लग्न आणखी काही दिवसांनी लांबणीवर जात आहे.
रणबीरआधी त्याचा भाऊ, आदर जैन हा प्रेयसी, अभिनेत्री तारा सुतारिया हिच्याशी लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.
नुकत्याच गोव्याला जाऊन आलेल्या या सेलिब्रिटी जोडीनं त्यांच्या या रिलेशनशिपला आता लग्नाचं नाव देण्याचा निर्णय़ घेतला आहे.
मागच्या काही काळापासून तारा आणि आदर एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचं रिलेशनशिपही आता सर्वज्ञात आहे, ज्यामुळं फार वेळ न दवडता ही जोडी लवकरत नात्याचा पुढचा टप्पा ओलांडणार असल्याचं म्हटलं जात आहे.