Kapoor Family ला हादरा; रणबीरच्या कुटुंबाशी 'तिनं' तोडलं नातं?

Entertainment News : कपूर कुटुंबाच्या आनंदाला गालबोट; सोबत तिचं नसणं पाहता आता तो कसा सावरणार याचीच चाहत्यांनाही चिंता. नातं का तुटलं हाच अनेकांना पडलेला प्रश्न... 

Updated: Jan 3, 2023, 12:22 PM IST
Kapoor Family ला हादरा; रणबीरच्या कुटुंबाशी 'तिनं' तोडलं नातं?  title=
Bollywood actress Tara Sutaria Actor Aadar Jain break up amid wedding rumours latest news

Kapoor Family : नाती किती क्षणभंगुर असतात याची प्रचिती कलाजगतातूनच येते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण, कालपर्यंत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या इथल्या अनेक जोड्यांचे क्षणात ब्रेकअप होताना इथं दिसतात. नाती तुटणं हे कलाजगतासाठी नवं नाही. पण, आता एका अशा सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे जे पाहता चाहत्यांनाही धक्का बसत आहे. कारण, या जोडीचं कपूर कुटुंबाशी खास कनेक्शन आहे.  

रणबीर आणि आलियाच्या (Ranbir kapoor Alia bhatt wedding) लग्नानंतर आता या कुटुंबात एकाच जोडीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ती जोडी म्हणजे अभिनेता आदर जैन आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांची. काही दिवसांतच त्यांच्या लग्नाचे सनई- चौघडे या कुटुंबात वाजण्याची तयारीही झाली होती. पण, आता मात्र या कुटुंबाशी सर्व नाती तोडत तारानं तिच्या वेगळ्या वाटा निवडल्या आहेत. आदर आणि तारा यांनी परस्पर सामंजस्यानं त्यांच्या नात्याचा पूर्णविराम दिल्याचं कळत आहे. असं असलं तरी अद्यापही या दोघांकडून मात्र त्याबाबच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. (Bollywood actress Tara Sutaria Actor Aadar Jain break up amid wedding rumours latest news )

मैत्री कायम असेल... 

कलाजगतात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार (tara sutaria insgram) तारा आणि आदर यांचं नातं कोणत्याही वाईट वळणावर येऊन संपलेलं नाही. किंबहुना त्यांनीच एकमेकांचं हित लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे. प्रेमाचं नातं तुटलं असलं तरीही त्यांच्या नात्यात असणारी मैत्री मात्र कायम राहणार असल्याची चिन्हं आहेत. सेलिब्रिटी जोड्यांमध्ये रिलेशनशिपमध्ये (relationship) आलेल्या दुराव्यानंतर कायम टिकून राहणारी मैत्री ही काही नवी बाब नाही, हेच या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. 

लग्न, पार्टी, कौटुंबीक समारंभांना दोघांची एकत्र उपस्थिती... 

तारा आणि आदर (tara suratria adar jain) यांनी कधीच त्यांचं नातं माध्यमांपासून किंवा इतर कोणापासूनही लपवून ठेवलं नाही. कुठला लग्नसोहळा असो, कुटुंबातील कुणाला वाढदिवस असो किंवा मह एखादा कौटुंबीक सोहळा असो. तारा आणि आदर सातत्यानं एकमेकांसोबतच दिसत होते. एकमेकांसोबत सहलींना जाणं, शक्य तितका वेळ एकमेकांसोबत व्यतीत या साऱ्यामुळं त्यांच्या नात्यात ही दुराव्याची ठिणगी पडेल याची कुणालाच कल्पनाही नव्हती. 

हेसुद्धा वाचा : बाप-लेकीची भूमिका साकारणारे Nana Patekar, Manisha Koirala एकेकाळी रिलेशनशिपमध्ये, 'या' कारणामुळे झालं ब्रेकअप

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TARA(@tarasutaria)

किंबहुना तारा कपूर कुटुंबाची (Kapoor Family) सून होणार इतक्यातच त्यांच्या नात्याला तडा गेला. त्यामुळं आता या आघातातून नाही म्हणता आदर आणि तारा दोघंही कसे सावरणार याचीच काळजी त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.