'या' खेळाडूला डेट करतेय अभिनेत्री तापसी पन्नू

 कोणाला डेट करतेय ? कधी लग्न करणार ? असे अनेक प्रश्न तिला मुलाखती दरम्यान विचारले जायचे.

Updated: May 12, 2020, 10:25 AM IST
'या' खेळाडूला डेट करतेय अभिनेत्री तापसी पन्नू  title=

मुंबई : अभिनय कौशल्य आणि मेहनतीवर बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावणारी अभिनेत्री तापसी पन्नूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सहसा कोणत्या वादात न अडकणाऱ्या तापसीच्या रिलेशनशीपवरुन अनेक चर्चा रंगत होत्या. ती कोणाला डेट करतेय ? कधी लग्न करणार ? असे अनेक प्रश्न तिला मुलाखती दरम्यान विचारले जायचे. अखेर याचे उत्तर मिळाले आहे. 

बॅडमिंटन प्लेयर मेथियस बो याला ती डेट करत असल्याचा खुलासा झाला आहे. तापसीच्या घरच्यांना देखील मेथियस आवडतो. स्वत: तापसीने यासंदर्भातील खुलासा केलाय. एका खासगी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य केलंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Good to be back on the tennis court after at least 20 years, to open @maharashtraopen. Happy to have a good partner in @leanderpaes as we were up against the unbeaten duo @hyeon519 and @taapsee 

A post shared by Mathias Boe (@mathias.boe) on

केवळ चर्चेत राहण्यासाठी आपण हे बोलत नाही कारण चाहत्यांचा विश्वास मी अनेक वर्षे मेहनत करुन मिळवलाय असे तापसी म्हणाली. त्यामुळे रिलेशनशीप बद्दल मला कोणती गोष्ट लपवायची नाहीय. 

तापसीचा जो निर्णय असेल त्यासोबत आम्ही असू असे तिची आई निर्मलजीत पन्नूने यावेळी म्हटले. 

'मी फक्त आणि फक्त मेहनत आणि जिद्दीच्या बळावर जीवनाच्या या टप्प्यावर पोहोचली आहे. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या मेहनतीचं फळ आहे. कलाविश्वात माझं कोणी गॉडफादर नाही. माझ्या आयुष्यात मी जे काही मिळवलं आहे ते कोणाला फसवूण मिळवलं नाही.' असे ती एका मुलाखती दरम्यान म्हणाली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Today I gave an interview to @tv2sportdk regarding my future, more specifically about my badminton future. I have decided that Olympics will be my last tournament, if we get selected, if not I will call it quits after Thomas Cup in May. Badminton has been my number one priority more than the last 20 years, it has given me some incredible highs, some really deep lows, badminton has made me who I’m, for good and bad. No doubt my retirement will leave some kind of emptiness, not having a goal to pursue, one that drives you to get up in the morning, but hopefully I will find a new goal to focus on. I can honestly say I’m looking forward to retiring even though I will miss competing against my great colleagues from around the world. As of now I don’t have any specific plans of what I wanna do, except spending more time with my family, girlfriend and friends, I feel a bit guilty for not seeing them more. I will continue pushing my self everyday to be in the best possible shape for the upcoming events, after all age is just a number 

A post shared by Mathias Boe (@mathias.boe) on

पुढे ती म्हणाली, 'म्हणून मला अशा मुलासोबत लग्न करायला आवडेल ज्याने स्वत:च्या बळावर आयुष्यात काही तरी साध्य केलं आहे आणि तो प्रामाणिक असला पाहिजे असेही तिने सांगितले होते. 

नुकतीच 'थप्पड' सिनेमात ती दिसली होती. यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले. याआधी भूमि पेडणेकरसोबत ती 'सांड की आंख' मध्ये दिसली होती. 'हसीन दिलरुबा' हा तिचा आगामी सिनेमा असणार आहे.