PHOTOS : सुष्मिताच्या वाढदिवसाला 'तो' आला अन्....

 तिच्या खासगी आयुष्यामुळे मात्र बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे. 

Updated: Nov 27, 2018, 03:44 PM IST
PHOTOS : सुष्मिताच्या वाढदिवसाला 'तो' आला अन्.... title=

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सक्रिय नसली तरीही तिच्या खासगी आयुष्यामुळे मात्र बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे. आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या म़ॉडेलला सुष्मिता डेट करत आहे. ज्यामुळे ही जोडी सर्वांचच लक्ष वेधत आहे. 

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या, वर्तणूकीतून आदर्श प्रस्थापित करणाऱ्या अनेकांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतेच तिच्या वाढदिवसाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कॅप्शनच सारंकाही सांगून जात आहे. 

आई, भाऊ, आपल्या दोन्ही मुली आणि प्रियकराच्या उपस्थितीत सुष्मिताचा यंदाचा वाढदिवस पार पडला. दुबईत तिने हा खास दिवस साजरा केला. त्यावेळी खास उपस्थिती ठरली ती म्हणजे तिच्या प्रियकराची. 

गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता आणि तिचा प्रियकर रॉमन शॉल या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याविषयी खुलेपणाने बोलण्यास, एखादी पोस्ट करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. रॉमनमागोमाग आता खुद्द सुष्मिताने एक पोस्ट करत थेट त्याचा उल्लेख 'लाईफ', म्हणजेच 'संपूर्ण आयुष्य', असा केला आहे. जणू तिने पुन्हा एकदा प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता कधी एकदा ते दोघंही या नात्याला नवं नाव देतात याचीच उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.