प्रियकरासोबत सुष्मिताचा रोमॅन्टिक फोटो पाहिला?

गेल्या काही महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. 

Updated: Nov 7, 2018, 04:00 PM IST
प्रियकरासोबत सुष्मिताचा रोमॅन्टिक फोटो पाहिला? title=

मुंबई : बऱ्याच अभिनेत्री, अभिनेते एकंदरच बरेच कलाकार मंडळी त्यांच्या रिलेशनशिपविषयी अधिकृत घोषणा करत असताना याला काही चेहरे मात्र अपवाद ठरले होते. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेन हिचं. 

सुष्मिता काही महिन्यांपासून तिच्याहून वयाने लहान असणाऱ्या रॉमन शॉल या मॉडेलला डेट करत आहे. पण, तिने अद्यापही आपल्या नात्याविषयी कुठेच वाच्यता केल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. पण, त्यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली हे मात्र तितकच खरं. 

चर्चांच्याच या वर्तुळात आता सुष्मिताने दिवाळीच्या या आनंदपर्वामध्येच सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. मुख्य म्हणजे या फोटोंमध्ये ती रॉमनसोबत मग्न असून, त्याला आपल्या मित्रपरिवाराशी आणि कुटुंबीयांशीही भेटवत असल्याचं कळत आहे. 

रॉमनसोबतचे तिचे फोटो पाहता आता तिने आणखी काही वेगळ्या पद्धतीने रिलेशनशनपची घोषणा करण्य़ाची गरजच नाही, हेसुद्धा स्पष्ट होत आहे. 

 
 
 
 

post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

रॉमन आणि सुष्मिता यांनी काही दिवसांपूर्वीच आग्रा येथील ताजमहालाला भेट दिली होती. ज्यानंतर एका दिवाळी पार्टीतही या दोघांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे खरंच सुष्मिता आणि रॉमन येत्य़ा काळात त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.