१८ व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीला करावा लागला लैंगिक शोषणाचा सामना

'एका रॅपरने माझं लैंगिक शोषण केलं होतं'

Updated: Sep 27, 2018, 11:40 PM IST
१८ व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीला करावा लागला लैंगिक शोषणाचा सामना title=

मुंबई : अगदी कमी कालावधीत हिंदी कलाविश्वात प्रसिद्धीझोतात येणाऱ्या चेहऱ्यांमध्ये येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री सवनी लिओनी. अडल्ट स्टार ते हिंदी कलाविश्वाची बेबी डॉल होण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा तितका सोपा नव्हता. किंबहुना सनपीला फार सुरुवातीपासूनच बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. मग ती अपमानास्पद वागणूक म्हणू नका किंवा मग लैंगिक शोषणाचा दुर्दैवी प्रसंग म्हणू नका.

एका मुलाखतीदरम्यान सनीने तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीवरून पडदा उचलला. त्या एका प्रसंगानंतर आनंदाच्या क्षणाला लगेचच कलाटणी मिळाली आणि परिस्थिती पुरती बदलून गेली असंही ती म्हणाली.

अनेक मुलींनी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. याविषयीच सांगत सनीने तिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाविषयी वाच्यता केली.

त्यावेळी मी माझ्या करिअरची सुरुवात करत होते. एका म्युझिक व्हिडिओची मला ऑफर आल्यामुळे त्यावेळी माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळी येत्या काळात आपण मोठी सेलिब्रिटी होणार, हीच भावना माझ्या मनात घर करुन गेली होती. पण, त्याच व्हिडिओच्या चित्रीकरणावेळी एका रॅपरने माझं लैंगिक शोषण केलं’, असं सनी म्हणाली.

आपल्यासोबत घडलेल्या त्या प्रसंगाप्रमाणेच इतरही कोणी अशा प्रसंगाचा सामना केला तर त्यांनी वेळीच याविषयी वाच्यता करावी असंही तिने स्पष्ट केलं.

चुकीच्या गोष्टींविषयी मौन पाळलं असता चुकीच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळतं हा मुद्दाही तिने यावेळी मांडला.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून कलाविश्वात अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रसंगांवुरुन पडदा उचलल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात सनीपासून ते सध्या चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्याही नावाचा समावेश आहे.