राजमहालाहून कमी नाही, सोनम कपूरचं लंडनमधील घर; पाहून प्रेमातच पडाल

तिच्या या घरात भारतीय ऐतिहासिक वास्तू आणि कलेला विशेष स्थान देण्यात आलं आहे

Updated: Sep 7, 2021, 03:47 PM IST
राजमहालाहून कमी नाही, सोनम कपूरचं लंडनमधील घर; पाहून प्रेमातच पडाल  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री (Sonam Kapoor) सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहूजा भारत आणि लंडनमध्ये ये-जा करतच असतात. मुंबईमध्ये सोनमचे वडील अभिनेता अनिल कपूर यांचं आलिशान घर कायमच सोनमच्या मनात खास जागेवर असतं. त्यातच आता आणखी एका घराची एंट्री झाली आहे.

सोनम आणि तिचा पती, आनंद अहूजा यांनी युकेमधील नॉटिंग हिल येथे एक सुरेख घर खरेदी केलं आहे. या नव्या घराची बातमी शेअर करताना अभिनेत्री सोनम कपूर हिनं घरातील अंतरंगही सर्वांच्या भेटीला आणले आहेत. 

अंबानींच्याही घराला लाजवेल टायगर श्रॉफचा आशियाना; फोटो पाहून म्हणाल 'घर हो तो ऐसा...'

 

सोनमच्या या नव्या घरामध्ये गडद रंगांचा वापर करण्यासोबत भारतीय ऐतिहासिक वास्तू आणि कलेला विशेष स्थान देण्यात आलं आहे. मॉडर्न आर्ट आणि प्राचीन कला यांचा सुरेख मेळ तिच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

या वास्तूमध्ये आनंदसोबत प्रवेश केला तेव्हाच हे आपलं घर असल्याची अनुभूती मनाला दिलासा देऊन गेली. असं म्हणत सोनमनं कॅप्शन लिहिलं. घराच्या सजावटीसाठी तिनं कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं यावरुनही पडदा उचलला. भारत माझा आत्मा आहे, तर लंडनमध्ये माझं मन रमलंय असं म्हणत तिनं दोघांशीही असणाऱ्या अव्यक्त नात्याचा उलगडा केला.