PHOTO : घरवापसीनंतर सोनालीला अखेर भेटली 'ती'....

रुपेरी पडदा, संपूर्ण कलाविश्वं आणि आपल्या देशापासून गेले काही महिने दूर असणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे अखेर भारतात परतली आहे. 

Updated: Dec 4, 2018, 10:45 AM IST
PHOTO : घरवापसीनंतर सोनालीला अखेर भेटली  'ती'.... title=

मुंबई : रुपेरी पडदा, संपूर्ण कलाविश्वं आणि आपल्या देशापासून गेले काही महिने दूर असणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे अखेर भारतात परतली आहे. सोमवारी, अगदी पहाटे ती मुंबईत दाखल झाली. त्यावेळी तिचं माध्यमांकडून दणक्यात स्वागत करण्यात आलं. सोनालीच्या येणाने चाहत्यांमध्येही आनंदाची लाट पाहायला मिळाली. 

हे एकंदर वातावरण आणि चाहत्यांकडून मिळणारं प्रेम या साऱ्याचा स्वीकार करत सोनालीने हात जोडून सर्वांना अभिवादन केलं. उपचार, वेदना, दु:ख आणि तरीही न डगमगणारं तिचं धैर्य या साऱ्या गोष्टी पाहून सोनालीच्या धाडसी वृत्तीची दाद द्यावी तितकी कमीच अशी प्रतिक्रियाही अनेकांनी दिली. 

आपल्या घरी आल्यानंतर सोनाली जणू काही एका वेगळ्याच विश्वात आली होती. याचा अंदाज तिची सोशल मीडिया पोस्ट पाहून सहज लावता येत आहे. सोनाली घरी परतल्यानंतर सर्वांनीच तिचं स्वागत केलं. यात ती सर्वात जास्त कोणाच्या आठवणीने व्याकूळ होती, तो म्हणजे तिच्यापाशी असणारी Icy नावाची पाळीव कुत्री.  

Icy सोबतचा एक सुरेख फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये सोनाली अतिशय प्रेमाने तिला कुरवाळताना दिसत आहे. यामध्ये एका वेगळ्याच नात्याची अनुभूतीही होत आहे. प्राणीमात्रांसोबत मनुष्याचं नातं किती दृढ असतं याचच हे उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही.