पतीसाठी सोनालीची मन हेलावणारी पोस्ट, एकदा वाचाच

...म्हणून सोनालीला ती पोस्ट लिहिताना काहीच सुचेना 

Updated: Nov 13, 2018, 08:17 AM IST
पतीसाठी सोनालीची मन हेलावणारी पोस्ट, एकदा वाचाच  title=

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये असून, तेथे कॅन्सरवर उपचार घेत आहे. आपल्या देशापासून, कुटुंबापासून दूर असणारी ही अभिनेत्री मोठ्या धीराने तिच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा सामना करत आहे. 

सोनाली चाहत्यांपासून दूर असली तरीही सोशल मीड़ियाच्या माध्यमातून मात्र ती अनेकांच्या संपर्कात आहे. याच माध्यमातून ती आपल्या प्रकृतीविषयी माहिती देत असते. उपचारपद्धती आणि प्रक्रियेविषयीसुद्धा ती अधिक माहिती देत असते. 
इतकंच नव्हे तर, सण-उत्सवांच्या निमिच्चाने चाहत्यांना शुभेच्छाही देत असते. 

सोनालीने काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट लिहिल्यानंतर आता तिने पती गोल्डी बेहेल याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

लग्नच्या वाढदिवसाचं निमित्त साधत तिने ही पोस्ट लिहित गोल्डीसोबत असणाऱ्या सुरेख नात्यावर एक प्रकाशझोत टाकला आहे. 

'मी हे लिहिण्यास सुरुवात केली तेव्हाच मला ठाऊक होतं, की माझ्या मनातील भावना या शब्दांवाटे व्यक्त करण्यास मी असमर्थ आहे', असं तिने लिहिलं. 

पतीविषयी लिहिण्यास शब्दही अपुरे पडतील, असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देण्याचा प्रयत्न केला. एक मित्र, पती म्हणून गोल्डी कशा प्रकारे आपल्या कुटुंबासाठी एका भक्कम आधाराची भूमिका बजावत आहे, हे तिने या पोस्टमध्ये लिहिलं. 

सोनालीच्या आजारपणामुळे दोन देशांमध्ये वारंवार ये-जा करणं, कुटुंबाकडे लक्ष देणं या साऱ्यामध्ये गोल्डीचं योगदान पाहता आतापर्यंत समोर आलेला सुखदु:खाच्या प्रत्येत प्रसंगात आपली साथ दिल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

कठिण प्रसंगात आपल्यासोबत आधार म्हणून उभं राहणाऱ्या गोल्डीच्या आनंदाचीच कामना तिने या पोस्टमधून करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

As soon I began to write this... I knew instantly that I wouldn’t be able to put down in words all the emotions and thoughts that were running through my head. Husband. Companion. Best friend. My rock. For me, that's @goldiebehl. Marriage is standing by each other, through thick and thin, in sickness and in health… and god knows, how we’ve been through that this year. What not many people realize is that cancer is not just an individual battle… it’s something that a family collectively goes through. I was also able to go on this journey, knowing that you’d juggle all your responsibilities, and take on some more and hold fort back home… all this while shuttling between two continents. Thank you for being my source of strength, love and joy, for being with me every single step of the way... thank you is such an understatement for how I feel. What do I say about someone who is a part of you, who is yours and nothing and nobody else matters? Happy anniversary Goldie! 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

तिची ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांचंही मन हेलावून गेलं. आजाराशी झुंज देतानाही सोनाली ज्या सकारात्मक वृत्तीने आयुष्याकडे पाहात आहे, दर दिवस आनंदाने जगत आहे हे पाहता ती खऱ्या अर्थाने इतरांसाठीही प्रेरणादायी ठरते आहे, असं म्हणायला हरकत नाही.