....म्हणून प्रियांकाच्या 'ब्रायडल शॉवर'मध्ये सोनाली भावूक

सोनाली म्हणते,  #RedIsTheColourOfRebirth 

Updated: Nov 2, 2018, 01:15 PM IST
....म्हणून प्रियांकाच्या 'ब्रायडल शॉवर'मध्ये सोनाली भावूक  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्राचा ब्रायडल शॉवर पार पडला. अमेरिकरन गायक निक जोनास याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांवरच प्रियांकाचा विवाहसोहळा येऊन ठेपलेला असतानाच आता तिच्या मित्रपरिवारामध्ये याविषयीची कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

अशाच उत्साहपूर्ण वातावरणात काही दिवसांपूर्वीच प्रियांकाचा ब्रायडल शॉवर पार पडला. ज्यामध्ये तिच्या मैत्रिणींची उपस्थिती पाहायला मिळाली. 

संपूर्ण कार्यक्रमादरम्यान प्रियांकाच्या चेहऱ्यावरचा आनंदही पाहण्याजोगा होता. 

'देसी गर्ल'च्या ब्रायडल शॉवरमध्ये अभिनेत्री नीतू सिंग आणि सोनाली बेंद्रे यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. 

कॅन्सरच्या उपचारासाठी परदेशात असणाऱ्या सोनालीने यावेळी आजारपण आणि उपचार पद्धतींपासून स्वत:साठी वेल काढत काही सुरेख क्षणांचा आनंद घेतल्याचंही सोशल मीडियावरील फोटो पाहता लक्षात आलं. 

सोनालीनेही या कार्यक्रमातील एक फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये आपल्या अतिशय जिवाभावाच्या मैत्रिणीला म्हणजेच प्रियांकाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर, त्यासोबतच भावूक होत तिने आपल्या मनीचे भावही व्यक्त केले आहेत. 

'बऱ्याच दिवसांनंतर गडद रंगाचा ड्रेस पुन्हा घालून मला अतिशय सुंदर वाटत आहे...', असं तिने या कॅप्सनमध्ये लिहिलं. सोबतच तिने #RedIsTheColourOfRebirth असा हॅशटॅगही जोडला आहे.

सोनालीच्या चेहऱ्यावरचं हास्य, आयुष्यातील हे वळण आणि तरीही त्याचा मोठ्या धाडसाने सामना करणारी सोनाली शब्दांच्या वाटे आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देण्यात यशस्वी झाली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.