Pornography Case नंतर शिल्पाला पहिल्यांदाच मिळाली पतीची साथ

पाहा या जोडीनं काय काम केलं?

Updated: Nov 9, 2021, 01:28 PM IST
Pornography Case नंतर शिल्पाला पहिल्यांदाच मिळाली पतीची साथ title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Raj Kundra first public appearance:अश्लील व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती, राज कुंद्रा याला काही दिवस कारागृहात काढावे लागले होते. या सर्व प्रकरणाचा शिल्पा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबावर मोठा परिणाम झाला होतात. किंबहुना शिल्पा आणि राजच्या नात्याला या साऱ्यामुळं तडा गेला अशीही अनेक वृत्त आली. या साऱ्या चर्चांवर शिल्पानं मात्र मौन पत्करलं. असं असलं तरीही ती आतापर्यंत मात्र पतीसोबत कुठेही दिसत नव्हती. पण. अखेर ती या वादानंतर पहिल्यांदाच सर्वांसमोर आली आहे. 

बऱ्याच काळानंतर आता शिल्पा आणि तिचा पती, राज कुंद्रानं माध्यमांसमोर येत सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. सध्या राज आणि शिल्पा हिमाचलमध्ये आहेत. जिथं देवदर्शन करत या जोडीनं सर्व विघ्न टळण्याची प्रार्थना केली आहे. शिल्पानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही या भेटीदरम्यानचे काही फोटो शेअर केले. जिथं ज्वालादेवी मंदिरात तिनं भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

शिल्पा सध्या हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणांना भेट दिली असून, ती पतीचा हात पकडून या मंदिरांमध्ये दर्शन घेताना दिसत आहे. शिल्पा इथं तिच्या चाह्यांसोबतही फोटो आणि व्हिडीओ टीपताना दिसली. जीवनातील अतिशय कठीण प्रसंगानंतर शिल्पा आणि तिचा पती शांत क्षण व्यतीत करताना दिसत आहेत.