काय म्हणता, प्रियांकाचं लग्न झालं?

प्रियांका चोप्रा सध्या प्रकाशझोतात असते ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे.

Bollywood Life | Updated: Sep 25, 2018, 06:25 PM IST
काय म्हणता, प्रियांकाचं लग्न झालं?  title=

मुंबई: हिंदी कलाविश्वात नावारुपास आल्यानंतर परदेशी मनोरंजन जगतात रुळलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या प्रकाशझोतात असते ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे. अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत काही दिवसांपूर्वीच तिने आपलं रिलेशनशिप सर्वांसमोर उघड केलं. ज्यानंतर निकसोबत ती ज्या ठिकाणी जाईल तिथे अनेकांचीच गर्दी पाहायला मिळाली.

कलाजगतात सध्याच्या घडीला ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या जोडीच्या लग्नाच्या चर्चांनाही आता उधाण आलं आहे. किंबहुना प्रियांकाने लग्नामधील काही फोटो पोस्ट करत अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.

झालात ना तुम्हीही थक्क? होय, प्रियांकाने सोशल मीडियावर तिच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे.

पण, यामध्ये एक ट्विस्ट आहे. कारण हा फोटो तिच्या खऱ्याखुऱ्या लग्नातील नसून आगामी चित्रपटाच्या सेटवरील आहे.

priyanka chopra

‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान लग्नाच्या दृश्यासाठी तयार होतेवेळचा फोटो प्रियांकाने शेअर केला. ज्यामध्ये ती लाल रंगाच्या लग्नाच्या पेहरावात दिसत आहे. तेव्हा आता तिच्या लग्नसमारंभाच्या चर्चांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे.

इटलीत ईशा अंबानीच्या साखरपुडा समारंभला हजेरी लावल्यानंतर देसी गर्लने पुन्हा एकदा चित्रपटांकडे तिचा मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आता येत्या काळात खऱोखरच ती आणि निक नेमके कधी लग्नगाठ बांधणार याचीच चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.