मुंबई : जागतिक स्तरावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं आपल्या नावातून पतीचं आडनाव कमी केलं आणि पाहता पाहता ही सर्वात मोठी बातमी ठरली. बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्यानंतर खरं काय आणि खोटं काय हेच जाणून घेण्यासाठी प्रत्येकानं विविध माध्यमांचा आधार घेतला.
(Priyanka Nick Divorce) प्रियांका आणि निक घटस्फोट घेण्याच्या तयारीत तर नाहीत, असाच अंदाजवजा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला.
आता प्रियांकानं नेमकं असं का केलं यावरुन पडदा उचलला गेला असल्याचं कळत आहे.
लग्नानंतर लगेचच प्रियांकानं तिच्या इन्स्टा प्रोफाईलवरील नावामध्ये जोनास हे आडनाव जोडलं होतं. पण, अचानकच तिनं हे नाव हटवलं.
असं म्हटलं जात आहे की, प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) प्रियांका चोप्राचा पती, जोनस (Nick Jonas) यानं हल्लीच एक पोस्ट केली आहे.
पोस्टच्या माध्यमातून तो एका शोबाबत माहिती देताना दिसत आहे. Netflix वर हा शो आज, म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून प्रदर्शित होत आहे.
निकच्या याच शो च्या धर्तीवर प्रियांकानं त्याआधीच त्याचं आडनाव आपल्या नावातून हटवणं यामागे त्याला चर्चेत आणण्याचा एकमेव हेतू असू शकतो.
निक आणि त्याच्या भावांची म्हणजेच जोनास ब्रदर्सची जेव्हाजेव्हा माहिती मिळते, त्यावेळी उत्साही प्रियांकाकडे सर्वांच्या नजरा वळतात.
मुळात प्रियांका यापूर्वीच निकच्या या कार्यक्रमाला प्रमोट करुन झाली आहे. तेव्हा आता पतीचा शो प्रमोट करत एका वेगळ्याच मार्गानं त्याला चर्चेत आणण्यासाठी प्रियांकानं आडनाव हटवण्याचं पाऊल उचललं असू शकतं असं म्हटलं जात आहे.
दरम्यान यावर प्रियांका आणि निकनं मात्र कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.