प्रियांका चोप्राच्या कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री?

जाणून घ्या त्या सदस्याविषयी...

Updated: Sep 4, 2019, 11:03 AM IST
प्रियांका चोप्राच्या कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री?  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्याच्या घडीला परदेशात तिच्या अभिनय कारकिर्दीला आणि वैवाहिक आयुष्याला प्राधान्य देत असली तरीही भारताशी आणि कुटुंबाशी असणारं नातंही ती तितक्याच आत्मियतेने जपत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रियांका आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास भारतात आले होते. निमित्त होतं, तिच्या भावाच्या म्हणजेच सिद्धार्थ चोप्राच्या लग्नसराईचं. 

सिद्धार्थ आणि त्याची होणारी पत्नी इशिता कुमार यांचा रोकाही झाला होता. पण, त्यानंतर मात्र या नात्यात तणाव निर्माण झाला आणि लग्न, सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. खुद्द प्रियांकाच्या आईनेच याविषयीची माहिती देत त्या दोघांनी (सिद्धार्थ आणि इशिताने) हा निर्णय परस्पर सामंजस्याने घेतला आहे, असं स्पष्ट केलं. 

कुटुंबातील या प्रसंगानंतर प्रियांका पुन्हा अमेरिकेला परतली. इथे पुन्हा एकदा सिद्धार्थचं आयुष्य पूर्वपदावर येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाच्या निमित्ताने रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी आयोजित समारंभाला प्रियांकाचा भाऊ एका नव्या चेहऱ्यासोबत दिसला. हा चेहरा होता दाक्षिणात्य अभिनेत्री नीलम उपाध्याय हिचा. 

नीलम आणि सिद्धार्थ या समारंभासाठी एकत्र आले. यावेळी त्यांनी अदगी सहजपणे माध्यमं, छायाचित्रकारांसमोर फोटोसाठी पोझही दिली. मुख्य म्हणजे त्या दोघांनीही एकसारख्या रंगाचा पेहराव केला होता. त्या दोघांनाही एकत्र पाहता, प्रियांकाच्या कुटुंबात नव्या सदस्याचा प्रवेश झाला असल्याचीच प्रतिक्रिया अनेकांनी देण्यास सुरुवात झाली आहे. 

Priyanka Chopra's brother Siddharth Chopra snapped with South actor Neelam Upadhyaya at Ambani's Ganesh Chaturthi bash

दरम्यान, चोप्रा कुटुंबीयांकडून अद्यापही याविषयीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. असं, असलं तरीही नीलम आणि सिद्धार्थची जोडी चर्चेत येण्यास मात्र सुरुवात झाली आहे, हे खरं. नीलमने आतापर्यंत तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'मि. 7', 'ऍक्शन थ्रीडी', 'उन्नोडू ओरू नाल' आणि 'ओम शांती ओम' या चित्रपटांतून ती झळकली आहे. येत्या काळात ती 'पंडगाला वाचडू' आणि 'तमाशा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.